आयुष्यात अनेक प्रयत्न करून देखील अनेकांना सुख, समाधान मिळत नाही. कठीण परिश्रम करणाऱ्यांना सुद्धा अपयशाला सामोरं जावं लागतं. या मागे कधी कधी घरातील वास्तूदोष असण्याची माहिती दिली जाते. जर घरातील वास्तूदोष असतील तर आयुष्यात आर्थिक, आरोग्याशी, तणाव संबंधीत अनेक अडचणी येतात. वास्तुशास्त्रात या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमुळे आयुष्यात अनेक त्रास सहन करावे लागतात. मात्र, वास्तूनुसार अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्या तर तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होऊन तुम्हाला उत्तम फायदे मिळू शकतात.
घरामध्ये ठेवा ‘या’ 3 गोष्टी
नारळ
- Advertisement -
- हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी नारळ चढवला जातो. हिंदू धर्मात नारळाचे खूप महत्त्व आहे.
- नारळ धार्मिक महत्त्वासोबतच वास्तू दोष दूर करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. असं म्हणतात की देवी लक्ष्मीला नारळ अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तो घरामध्ये ठेवल्याने धनाची कमतरता भासत नाही.
- मान्यतेनुसार, नारळाला घराच्या मंदिरात कलश रूपात ठेवल्याने घरात सुख, समृद्धी येते.
- Advertisement -
शंख
- हिंदू धर्मात शंखाचे विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, शंख नियमीत घरामध्ये सकाळ-संध्याकाळी वाजवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच याच्या आवाजाने घरातील कटकटी कमी होतात.
- पुरातन ग्रंथामध्ये शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती, त्यामुळे देवी लक्ष्मीला तो अतिशय प्रिय आहे, इतकंच नव्हे तर भगवान विष्णूंनी त्यांच्या हातामध्ये शंख धारण केला आहे.
- जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शंख दररोज वाजवत असाल तर नक्कीच तुमची आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होऊ शकते.
लक्ष्मी-नारायण फोटो
- आयुष्यातील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तसेच वैवाहिक जीवनातील क्लेश सुधारण्यासाठी घराच्या मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायणांचा एकत्र फोटो ठेवा आणि त्याची नियमीत पूजा करा.
- लक्ष्मी-नारायणांच्या फोटोची पूजा केल्यानंतर नियमीत ॐ नमो लक्ष्मी नारायण नमः या लक्ष्मी-नारायण मंत्राचा १०८ वेळा जप करा.
- प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाची फुलं अर्पण करा आणि त्यांच्याकडे कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी आर्शिवाद मागा.