Vastu Tips : सकारात्मक ऊर्जेसाठी घरामध्ये ताज्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवा अन् पाहा चमत्कार

सर्वांनाच आपलं घर आपल्या आवडीनुसार सजवायला खूप आवडतं. त्यासाठी आपण अनेक विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंचा वापर करतो. वेगवेगळे फोटो, फ्लॉवर पॅट, मूर्ती अश्या अनेक गोष्टी आपण घर सजवण्यासाठी घरी आणतो. या सर्वांमध्ये अनेक सुवासिक फुलांचा देखील वापर करतो. घराज्या सजावटीमध्ये ताज्या सुवासिक फुलांचा वापर केल्याने अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. या फुलांमुळे घरामधील वास्तुदोष नाहीसा होतो.

वास्तू तज्ञांच्या मते, ताज्या फुलांना घरामध्ये ठेवल्याने एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तर दुसरीकडे त्या कुटुंबातील व्यक्ती सफलतेच्या मार्गाने चालू लागतात. घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी होतं. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांबद्दल माहिती देणार आहोत. वास्तूमध्ये याचं अगणित महत्व सांगण्यात आलं आहे.

सकारात्मक ऊर्जेसाठी घरामध्ये ठेवा गुलाबाच्या पाकळ्या


अनेकजण घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण करण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर करतात. परंतु या सर्वांपेक्षा गुलाबाच्या पाकळ्या सर्वोत्तम आहेत. घरामध्ये गुलाबाच्या सुगंधी पाकळ्या ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना शांती मिळते.

अशाप्रकारे ठेवा घरामध्ये गुलाबाच्या पाकळ्या
घरामध्ये एका काचेच्या पसरट भांड्यात पाणी ओतून त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाका. मात्र हे पात्र मुख्य दरवाजाच्या आसपास ठेवा.


हेही वाचा :Vastu Tips : घरातील सुख-शांतीसाठी फेंगशुईचे काही महत्वाचे नियम