वास्तूशास्त्रात घरातील सकारात्मक ऊर्जेवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तु शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. खरंतर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तुचे मोठं महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरातील कपाट, घराचा रंग, पूजा घर, घरातील घड्याळ इतकंच नव्हे तर घरामध्ये कोणत्या दिशेला कोणता फोटो लावायला हवा यांसारख्या प्रत्येक गोष्टीमागे वास्तुचे काही नियम आहेत.
अनेकजण आपल्या घरामध्ये असे फोटो लावतात जे वास्तूसाठी अशुभ मानले जातात. यांमुळे घरातील वातावरणामध्ये तणाव निर्माण होतो आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढू लागते.
घरात अशाप्रकारचे फोटो लावल्याने वाढू शकते नकारात्मकता
- घरामध्ये कधीही मावळत्या सूर्याचे चित्र किंवा फोटो लावू नका. कारण मावळता सूर्य म्हणजे दिवसाचा शेवट आणि रात्रीची सुरूवात दर्शवते. असा फोटो घरात लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते.
- आपल्या मृत पूर्वजांचे फोटो घराच्या मंदिराजवळ ठेवू नका, मृत व्यक्तींचे फोटो दक्षिण भिंतीवर लावावे.
- पती-पत्नी किंवा कुटुंबाचे फोटो दक्षिण , नैऋत्य या दिशेला लावू नये. यामुळे घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते.
- घरामध्ये आगीचे किंवा समुद्रामध्ये बुडणाऱ्या जहाजाचे फोटो लावू नका. कारण हे अशुभ मानले जाते.
- घरात कधीही युद्ध, ज्वालामुखी, मुसळधार पाऊस, वादळ यांसारखे आपत्ती दर्शवनारे फोटो लावू नका, कारण असे फोटो नकारात्मकता दर्शवतात.
- घरामध्ये हिंसक प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे फोटो लावू नये.
- घरामध्ये महाभारत, ताजमहाल यांसारख्या ऐतिहासिक गोष्टींचे देखील फोटो लावू नका. कारण या गोष्टी नकारात्मकता दर्शवतात.