घरभक्तीVastu Tips : कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी लावा 'ही' ७ प्रकारची झाडं

Vastu Tips : कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी लावा ‘ही’ ७ प्रकारची झाडं

Subscribe

हिरवी गार झाडं सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शिवाय झाडांमुळेच वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

पौराणिक कथांनुसार सृष्टीची निर्मिती करताना ब्रम्हदेवांनी सर्वप्रथम झाडांची रचना केली होती. त्यामुळे हिंदू धर्मात झाडांना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. झाडांमुळे आणि त्यापासून बनलेल्या वनस्पतींमुळेच आपण आपल्या जीवनोपयोगी वस्तू प्राप्त करू शकतो. मानवी जीवन जास्त प्रमाणात झाडांवर अवलंबून आहे. कारण झाडांपासूनच आपल्याला प्राण वायू, फळं, फुलं आणि इतर अनेक जीवनोपयोगी वस्तू मिळतात. हिरवी गार झाडं सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शिवाय झाडांमुळेच वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

वास्तु शास्त्रात अशीच काही महत्त्वपूर्ण झाडं आहेत जी आपल्या कुटुंबाच्या सुखाचे कारण बनू शकतात

- Advertisement -

अशोकाचे झाड
अशोकाच्या झाडाचे वर्णन रामायणात सुद्धा केलेलं आहे. पौराणिक ग्रंथांच्या मते सीतेचं अपहरण केल्यानंतर रावणाने तिला अशोकाच्या झाडाखाली ठेवले होते. वास्तु शास्त्रानुसार अशोकाचे झाड घराच्या उत्तरेला लावल्यास घरात शुभता येते. तसेच घरातील व्यक्तींच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

केळीचे झाड
केळीच्या झाडाला बृहस्पती ग्रहाचे प्रतीक मानले जाते, केळाचे झाड घरा बाहेरच्या ईशान्य कोपऱ्यात लावावे. यामुळे घरातील व्यक्तींना सफलता प्राप्त होते.

- Advertisement -

कमळाचे रोपटे
कमळाचे रोपटे पाण्यात उगवते. घराच्या ईशान्य किंवा उत्तरेस एक लहान तलाव बनवून हे लावल्यास, देवी लक्ष्मीचा आर्शिवाद तुम्हाला प्राप्त होईल.

वडाचे झाड
वास्तु शास्त्रात वडाच्या झाडाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. घरापासून १०० मीटर लांब अंतरावर वडाचे झाड लावावे. ज्यामुळे तुम्हाला याचे शुभ परिणाम प्राप्त होतात.
परंतु वडाचे झाड घराच्या पश्चिमेला लावू नये, शिवाय या झाडाची सावली कधीही तुमच्या घरावर पडू नये.

आवळ्याचे झाड
आवळ्याच्या झाडाला खूप शुभ मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार आवळ्याच्या झाडावर भगवान शंकर आणि विष्णूंचा वास असतो. तुमच्या अंगणात हे झाड लावल्यास त्याचे अनेक फायदे तुम्हाला होतील.

नारळाचे झाड
ज्योतिष शास्त्रनुसार नारळाचे झाड सकारात्मकता प्रदान करते. घराच्या बागेत हे नक्की लावायला हवे.

तुळशीचे रोपटे
तुळशीच्या रोपट्याला वास्तु शास्त्रात सर्वोत्तम वृक्ष मानलं जातं, तसेच हे औषधी गुणांनी परिपूर्ण असते. तुळशीचे रोपटे घराच्या पूर्वेला किंवा ईशान्येला लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

 

 

 

Vastu Tips : सफलता आणि धनप्राप्तीसाठी घरामध्ये ठेवा बांबूचे रोपटं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -