Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Vastu Tips : सूर्यास्तानंतर केलेलं 'हे' काम मानलं जात अशुभ

Vastu Tips : सूर्यास्तानंतर केलेलं ‘हे’ काम मानलं जात अशुभ

Subscribe

हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर काही गोष्टी करण्यास नकार देण्यात आला आहे. आपण अनेक आपल्या कुटुंबातील वडील धाऱ्या व्यक्तींकडून सूर्यास्तानंतर काही गोष्टी करु नये असे ऐकले आहे. धर्म शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलंय की, सूर्यास्तानंतर काही अशा गोष्टी आहेत जे करण्यास अशुभ मानले जाते.

सूर्यास्तानंतर कधीही करु नका ‘या’ गोष्टी

- Advertisement -

 • संध्याकाळी झोपू नये
  ज्योतिष शास्त्रामध्ये संध्याकाळी जो व्यक्ती झोपतो त्याला अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. तसेच संध्याकाळच्या वेळी घरामध्ये देवी लक्ष्मी वास करत असल्याचं म्हटलं जातं. अशावेळी जर घरामध्ये कोण झोपलं असेल तर देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात.
 • संध्याकाळनंतर घरामध्ये झाडू मारु नये
  हिंदू धर्मामध्ये संध्याकाळनंतर कधीही झाडू मारु नये. कारण असं केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
 • उंबरठ्यावर बसू नये
  संध्याकाळनंतर कधीही घराच्या उंबरठ्यावर बसू नये. शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते.
 • तुळशीची पूजा करु नये
  शास्त्रात तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तसेच दररोज तुळशीची पूजा देखील केली जाते. मात्र, संध्याकाळनंतर कधीही तुळशीला स्पर्श करु नये. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
 • या गोष्टींचे दान करु नये
  वास्तू शास्त्रानुसार, कधीही कोणाला घरातील दही, दूध, मीठ, तेल, पिठ देऊ नये. असं केल्यास घरामध्ये दरीद्रता येते.

 


- Advertisement -

हेही वाचा :

Vastu Tips : स्वयंपाकघरासंबंधित ‘हे’ नियम पाळल्याने देवी अन्नपूर्णा होते प्रसन्न

- Advertisment -