हिंदू धर्मात हळदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे, हळदीला भगवान विष्णू आणि गुरू ग्रहाशी संबंधीत मनाले जाते. भगवान विष्णू आणि गुरू ग्रह आपल्यावर खूश असतील तर आयुष्यात आपल्याला खूप यश मिळते. यांच्या शुभ कृपेने आपल्या पत्रिकेतील अनेक वाईट दोष नाहीसे होतात. परंतु यांना नेहमी खूश ठेवण्यासाठी तुम्हाला हळदीशी संबंधीत काही अचूक उपाय करायला हवे.
हळदीचे हे उपाय आहेत अत्यंत लाभदायक
- प्रत्येक गुरूवारी भगवान विष्णूंची पूजा-आराधना करा आणि त्यांना पूजे दरम्यान हळदीचा टिळा लावा. लवकर लग्न व्हावे यासाठी आणि वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी हा चांगला उपाय आहे.
- गुरूवारच्या दिवशी पूजा करताना कपाळावर आणि मानेवर हळदीचा टिळा लावा, यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते.
- गुरूवारी अंघोळ करताना पाण्यात चिमुटभर हळद टाका, असं केल्यास नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश मिळते. शिवाय हा उपाय दररोज केला तर याचा अधिक फायदा तुम्हाला होऊ शकतो.
- परीक्षेसाठी किंवा इंटरव्यूसाठी जाण्याआधी एका लहान रूमालामध्ये एक चिमुटभर हळद ठेवा. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल.
- Advertisement -
- घराच्या बाहेरील भिंतीवर आणि मुख्य दरवावर हळदीचे स्वस्तिक काढा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
- प्रत्येक गुरूवारी सकाळी केळीच्या झाडाला हळदीचे पाणी टाका. यामुळे लग्नाशी संबंधीत समस्या दूर होतात.
- प्रत्येक गुरूवारी हळदीमध्ये थोडे पाणी टाकून त्याचे मिश्रण मुख्य दाराच्या उंभऱ्याला लावावे, या उपायाने देवी लक्ष्मी घरामध्ये निरंतर निवास करते.
हेही वाचा :
Vastu Tips : घरामध्ये मातीच्या ‘या’ वस्तू ठेवल्याने होतो भाग्योदय
- Advertisement -
- Advertisement -