आपल्या सर्वांनाच आपलं घर आपल्या आवडीनुसार सजवायला आवडते. त्यासाठी आपण अनेक विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंचा वापर करतो. वेगवेगळे फोटो, फ्लॉवर पॅट, मूर्ती अश्या अनेक गोष्टी आपण घर सजवण्यासाठी घरी आणतो. या सर्वांमध्ये आर्टिफिशियल रंगी-बेरंगी नकली फुलांचा, पानांचा देखील समावेश असतो. मात्र खरी फुलं जेवढी आपल्याला सकारात्मकता देतात, तेवढी सकारात्मकता आपल्या आर्टिफिशियल फुलं देत नाहीत, याउलट वास्तू शास्त्रानुसार नकली आर्टिफिशियल फुलं घरामध्ये नकारात्मक पसरवू शकतात.
नकली फुलांचा वापर केल्यामुळे होतात हे गंभीर परिणाम
- कुटुंबामध्ये वाद निर्माण होतो
वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये कधीही आर्टिफिशियल वस्तूंचा जास्त प्रणामात वापर करू नये. कारण आर्टिफिशियल गोष्टींमुळे नकारात्मकता पसरते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वारंवार कलह निर्माण होतो. - आरोग्यावर होतो परिणाम
वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये नकली वस्तूंचा वापर केल्याने घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर गंभीर परिणान पाहायला मिळतो. घरातील आर्टिफिशियल वस्तूंमुळे माइग्रेन, मानसिक तनाव, चिडचिड होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
- Advertisement -
- आर्थिक परिस्थिती कमजोर होते
वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये नकली वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, अशा वेळी या ठिकाणी अलक्ष्मी वास करते. ज्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते तिथे आर्थिक परिस्थिती कमजोर होते.
हेही वाचा :
Vastu Tips : शांत झोप लागत नाही? करा ‘हा’ वास्तू उपाय
- Advertisement -
- Advertisement -