वास्तू शास्त्रात घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची एक योग्य दिशा निश्चित केलेली असते. जर ती वस्तू घरामध्ये अयोग्य दिशेला ठेवली गेलेली असेल तर, तुम्हाला याचे नुकसान देखील भोगावे लागू शकतात. मात्र जर ती योग्य दिशेला ठेवलेली असेल तर त्याचे चांगले परिणाम देखील पाहायला मिळू शकतात. घरातील अनेक गोष्टींपैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील कचऱ्याचा डबा. जर कचऱ्याचा डबा चुकीच्या जागी ठेवलेला असेल तर तुमच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवण्याची योग्य दिशा लक्षात घेऊन आजचं त्याची जागा बदला.
‘या’ दिशेला कधीही ठेवू नका कचऱ्याचा डबा
- ईशान्य दिशा
उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला कधीही कचऱ्याचा डबा ठेवू नये, कारण वास्तू शास्त्रात ईशान्य दिशेला देवी-देवतांची दिशा मानले जाते. या दिशेला सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते. जर या दिशेला तुम्ही कचऱ्याचा डबा ठेवला तर अनेक वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. - आग्नेय दिशा
दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेला खूप शुभ मानले जाते. आग्नेय दिशा अग्निशी संबंधीत आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कचऱ्याचा डबा ठेवल्यास तुमची आर्थिक परिस्थिती खराब होऊ लागते. - पूर्व दिशा
वास्तू शास्त्रात पूर्व दिशेला अत्यंत शुभ मानले जाते. सूर्य पूर्व दिशेला उगवतो, या दिशेला सूर्याची दिशा देखील मानले जाते. त्यामुळे या दिशेला कधीही कचऱ्याचा डबा ठेवू नये. कारण यामुळे तुमच्या घरामध्ये क्लेश कलह निर्माण होऊ शकतात. - उत्तर दिशा
वास्तू शास्त्रात उत्तर दिशेला देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची दिशा मानली जाते. तसेच या दोन्ही देवतांना धनाचे दैवत मानले जाते. त्यामुळे उत्तरेला तुम्ही कचऱ्याचा डबा ठेवला तर तुम्हाला धनहानिचा सामना करावा लागू शकतो. शिवाय तुमच्या कुटुंबात मानसिक ,आर्थिक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. - दक्षिण दिशा
वास्तू शास्त्रात दक्षिण दिशेला यमराजाची दिशा समजले जाते. या दिशेला कधीही कचऱ्याचा डबा ठेवू नये. कारण यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येऊ शकते. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होऊ शकते.
घरामध्ये ‘या’ दिशेला ठेवा कचऱ्याचा डबा
वास्तू शास्त्रानुसार, घराच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) आणि वायव्य (उत्तर-पश्चिम) या दोन्हीपैकी एकीकडे तुम्ही कचऱ्याचा डबा ठेवू शकता.