Thursday, May 25, 2023
घर मानिनी Religious Vat Purnima : वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका 'या' चुका

Vat Purnima : वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका ‘या’ चुका

मराठी दिनर्दशिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. यावर्षी हा सण 3 जून रोजी साजरा केला जाईल. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते?

पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रतता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही तो दीर्घायुष्य जगेल, असे वरदान त्यांनी दिले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

वटपौर्णिमेच्या दिवशी करु नका ‘या’ चूका

- Advertisement -

  • वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये, त्याची फांदी तोडू नये. जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा.
  • वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये, काळे-निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते. या दिवशी लाल, हिरवा, पिवळा असं शुभ रंग परिधान करावे.
  • वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.
  • गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये.

हेही वाचा : Vat Purnima : वटपौर्णिमेला वडाची पूजा का केली जाते?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini