घरभक्तीShukra Gochar 2022 : आजपासून 27 दिवस 'या' लोकांवर शुक्राच्या कृपेने होईल...

Shukra Gochar 2022 : आजपासून 27 दिवस ‘या’ लोकांवर शुक्राच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस

Subscribe

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह योग्य वेळी आपल्या राशीत बदल करत असतो. शुक्र 23 मे च्या रात्री राशी बदलून मेष राशीत प्रवेश करेल. (Shukra Gochar 2022) तो आता मीन राशीत आहे. शुक्र राशी (Zodic) बदल सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करेल. पण हा राशी बदल 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. (Shukra Gochar)

मेष : शुक्राचा राशी बदल मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी देईल. आतापर्यंत जे अडथळे येत होते ते आता दूर होतील. पदोन्नती मिळू शकते. उत्पन्न वाढू शकते. नवीन नोकरी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत प्रेम वाढेल. तुम्ही रोमँटिक डेटवर जाऊ शकता.

- Advertisement -

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी मेष राशीत शुक्र प्रवेशामुळे उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वेळ ठीक राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. बर्‍याच काळानंतर तुम्ही कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. अफेअर सुरू होऊ शकते.

कर्क : कार्यक्षेत्रात प्रगती होईल. बदल घडू शकतात. नोकऱ्या बदलू शकते. प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. बॉसशी चांगले जमेल. नवीन प्रोजक्टवर काम सुरू होऊ शकते. व्यापाऱ्यांना मोठे डिल मिळू शकते.

- Advertisement -

सिंह: सिंह राशीच्या लोकांना हा काळ खूप लाभदायक ठरेल. इच्छित नोकरीचा शोध पूर्ण होईल. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरात काही अडचण आली तर ती आता दूर होईल. उत्पन्न वाढेल, बचत करू शकाल.

तूळ: शुक्राच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात रोमांस निर्माण होईल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. प्रेमी युगल आणि विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. जे लोक ग्लॅमरच्या दुनियेशी जोडले गेले आहेत, त्यांना सन्मान आणि प्रगती मिळेल. प्रवास होऊ शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. माय महानगर याची पुष्टी करत नाही.)


Buddha Purnima 2022 : गौतम बुद्धांनी कुटुंबाचा त्याग का केला?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -