Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious खूप कमी व्यक्तींच्या हातामध्येच असते 'ही' भाग्यरेषा

खूप कमी व्यक्तींच्या हातामध्येच असते ‘ही’ भाग्यरेषा

Subscribe

हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच हस्तरेषा शास्त्राचे महत्त्व देखील सांगण्यात आले आहे. हस्तरेषा शास्त्रामध्ये आपल्या तळहातावरील रेषा, आकृत्या, चिन्ह या सर्वांचे निरिक्षण करून त्यांच्या स्थितीच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव, गुण आणि भविष्य सांगण्यात येते. हातांच्या रेषांच्या आधारे व्यक्ती कसे आयुष्य जगेल, त्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल, त्याचे करिअर, वैवाहिक जीवन, प्रेम, आरोग्य यांसारख्या अनेक गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता.

हातावरील या रेषांच्या स्थितीमुळे चमकेल तुमचे आयुष्य

Afbeeldingen over "Palm Reading" – Blader in stockfoto's, vectoren en  video's over 16,578 | Adobe Stock

- Advertisement -

हस्तरेखा शास्त्रात काही रेषांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांपैकी-हृदय रेषा (heart line), जीवन रेषा (life line), विवाह रेषा (marriage line) आणि भाग्य रेषा (fate line).या रेषांच्या स्थिती वरून सहज लक्षात येते की, ते आपल्याला शुभ फळ देणार की अशुभ. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या हातावर या सर्व रेषा नसतात. असं खूप कमी पाहायला मिळते की, या सर्व रेषा एखाद्या व्यक्तीच्या हातावर असतात. भाग्यरेषेला तळहातावरील सर्वात महत्त्वाची रेषा मानले जाते. ही रेषा ज्या व्यक्तीच्या हातावर असते, अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते.

ही भाग्यरेषा बदलेल तुमचे आयुष्य

- Advertisement -

  • ही आयुष्य बदलणारी भाग्य रेषा मणिबंध पासून सुरू होऊन मधल्या बोटाच्या म्हणजे शनी पर्वतापाशी जाऊन थांबते. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये अशी संपूर्ण रेषा असेल त्या व्यक्तीला भाग्यवान मानले जाते. अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक पद-प्रतिष्ठा प्राप्त होतात.
  • कधी कधी काही व्यक्तींच्या हातामध्ये ही रेषा मणिबंध पासून सुरू न होता. चंद्र पर्वतापासून सुरू होऊन शनी पर्वतापर्यंत जाते. अश्या व्यक्तींना आयुष्यात खूप मान-सन्मान मिळतो. शिवाय असे व्यक्ती खूप लोकप्रिय सुद्धा होतात.
  • भाग्य रेषा जेव्हा जीवन रेषेपासून सुरू होऊन शनी पर्वताला जाऊन पोहोचते. तेव्हा असे लोकांना कधीही आयुष्यात पैश्यांची कमतरता भासत नाही.

 


हेही वाचा : तुमचा जन्म देखील जून महिन्यात झालाय का? वाचा ‘हे’ खास गुण

- Advertisment -

Manini