Thursday, April 25, 2024
घरमानिनीReligiousChanakya Niti : व्यवसायामध्ये यश हवंय...? 'या' 5 नियमांचे करा पालन

Chanakya Niti : व्यवसायामध्ये यश हवंय…? ‘या’ 5 नियमांचे करा पालन

Subscribe

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात या गोष्टींचा वापर केल्यास आयुष्यातील अनेक संकटांवर मात होऊ शकते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यात सफलता आणि सुख प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकजण खूप मेहनत घेतो. मात्र अनेकदा खूप मेहनत करूनही असफलतेचा सामना करावा लागतो. अशा वेळी हताश न होता, आयुष्यात चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करा.

- Advertisement -

चाणक्यांनी सांगितलेले मंत्र

  • चाणक्यांचा पहिला मंत्र

चाणत्यांच्या मते, कोणतेही काम सुरू करण्याआधी आपली वेळ कशी चालू आहे हे पाहायला हवे, योग्य वेळ चालू असल्यावरच नवीन कामाला सुरूवात करावी. कारण संयमाने केलेल्या कोणत्याही कामाला नेहमीच यश मिळते.मात्र याउलट जर काम सुरू करताना ते घाईगडबडीत चालू केले तर ते पूर्ण होत नाही.

  • चाणक्यांचा दुसरा मंत्र

चाणत्यांच्या मते, व्यक्तीला मित्र आणि शत्रू यांच्यातला फरक ओळखता यायला हवा. अनेकजण आपल्या शत्रू पासून नेहमी सावध राहतात, मात्र मित्ररूपी शत्रूसोबत राहून धोका पत्करतात आणि नुकसानाला सामोरे जातात.

- Advertisement -
  • चाणक्यांचा तिसरा मंत्र

चाणत्यांच्या मते, व्यक्तीला कोणतीही गोष्ट नीट माहित नसणे, ही त्याची सर्वात मोठ्ठी कमजोरी आहे. त्यामुळे कोणतेही काम सुरू करण्याआधी ते नीट माहिती करून घ्या.

  • चाणक्यांचा चौथा मंत्र

चाणक्यांच्या मते, व्यक्तीला आपल्या कमाईची आणि खर्चाचा नीट जाण असायला हवी, कधीही आपल्या कमाईपेक्षा अधिक खर्च करू नये. नेहमी बचत करावी.

  • चाणक्यांचा पाचवा मंत्र

चाणक्यांच्या मते, व्यक्तीने नेहमी आपल्या ताकदीपेक्षा जास्त स्वप्न बघावे, तेव्हाच आपण ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कुवतीपेक्षा कमी काम केल्याने असफलता हाती लागते.

 


हेही वाचा :

Chanakya Niti : आयुष्यात ‘या’ व्यक्तींची कधीही मदत करू नये

- Advertisment -

Manini