Thursday, January 23, 2025
HomeमानिनीReligiousपूजेमध्ये धूप, अगरबत्ती लावण्यामागे धार्मिक महत्व काय?

पूजेमध्ये धूप, अगरबत्ती लावण्यामागे धार्मिक महत्व काय?

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनामध्ये दीप, गंध, नवैद्य, कापूर, शंखनाद, घंटानाद, फुलं या गोष्टींना विशेष महत्व आहे. त्याचंप्रमाणे पूजेमध्ये अगरबत्ती आणि धूप लावण्याचे देखील विशेष महत्व आहे. पण पूजेदरम्यान धूप, अगरबत्ती का लावली जाते, यामागचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का? खरं तर, पूजेमध्ये लावल्या जाणाऱ्या धूप, अगरबत्तीच्या सुगंधी सुवासाने आजपासचे वातावरण सकारात्मक होते. याशिवाय याचे अनेक फायदे देखील आहेत.

पूजेमध्ये धूप, अगरबत्ती का लावावी?

पूजा के दौरान क्यों जलानी चाहिए धूप? जानें, इसके सभी फायदे - puja dhupbatti  benefits mt – News18 हिंदी

  • शास्त्रानुसार, पूजेदरम्यान त्या ठिकाणी सुगंधी धूप, अगरबत्ती लावल्याने आजपासचे वातावरण सकारात्मक होते. ज्या ठिकाणी असलेली नकारात्मकता दूर होते.
  • दररोज पूजेमध्ये धूप, अगरबत्ती लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतो. ज्यामुळे कुटुंबातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. असं म्हणतात, देवी लक्ष्मीला सुगंध खूप प्रिय आहे. ज्या ठिकाणी दुर्गंधी असते, त्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो.
  • पूजेदरम्यान तसेच स्तोत्र, मंत्राचे पठण करताना देखील आवर्जून धूप लावावा, यामुळे आपले मन एकाग्र होते.
  • घरामध्ये पूजेदरम्यान आवर्जून धूप लावावा. ज्यामुळे घरात सुख-समद्धी निर्माण होईल.
  • तसेच धूप, अगरबत्तीच्या सुगंधाने आपले मन देखील प्रसन्न होते.
  • मानसिक तणाव दूर करण्यासाठी देखील सुंगधी धूप किंवा अगरबत्तीचा वापर करावा.

 


हेही वाचा :

शास्त्रानुसार कोणत्या बोटाने कपाळावर टिळा लावावा?

Manini