घरभक्तीकधी आहे कालभैरव जयंती? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

कधी आहे कालभैरव जयंती? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Subscribe

कालभैरव भगवान शंकरांच्या रुद्र अवतारातील एक आहे. त्यामुळेच कालाष्टमी देखील शिव भक्त आनंदाने साजरी करतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी असते. या महिन्यातील 16 नोव्हेंबर कालाष्टमीला असणार आहे. तसेच या दिवशी कालभैरव जयंती देखील साजरी करण्यात येईल.

कालाष्टमीचे काय आहे महत्व
धार्मिक मान्यतेनुसार, कालाष्टमीच्या दिवशी भगवान भैरव यांचे व्रत आणि पूजन केले जाते. असं म्हणतात की, कालभैरवांच्या पूजा-आराधनेने साधकाला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्ती मिळते. सोबतच रोगांपासून देखील मुक्ती मिळते. भगवान भैरव आपल्या भक्तांचे नेहमी संरक्षण करतात. त्यांच्या उपासनेने नकारात्मक शक्ती देखील नष्ट होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

कालभैरव जयंती शुभ मुहूर्त
यंदा कालभैरव जयंती बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी असणार आहे. या दिवशी कालभैरव जयंतीची सुरुवात सकाळी 5:49 पासून होणार आहे तसेच समाप्ती 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:57 पर्यंत होईल.

कालभैरव जयंतीला काय करावे?
या दिवशी कालभैरवांसोबतच भगवान शंकर आणि देवी दुर्गाची देखील पूजा केली जाते.
या दिवशी भैरव मंदिरामध्ये शेंदूर, राईचे तेल, नारळ, चने दान करावे.
या दिवशी कालभैरवांच्या मूर्ती किंवा फोटो समोर राईच्या तेलाचा दिवा लावून श्री काल भैरव अष्टकाचे पठण करा.
या दिवशी काळ्या कुत्र्याला गोडी चपाती खाऊ घाला.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘या’ दिवशी असणार पहिला मार्गशीर्ष गुरुवार; जाणून घ्या महत्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -