हिंदू धर्मात लग्नाआधी लग्नासंबंधित अनेक प्रथा पूर्ण कराव्या लागतात. ज्यामध्ये वर-वधूला मेहंदी काढणं आणि हळद लावणं या दोन्ही महत्वाच्या प्रथा आहेत. परंतु असे म्हटले जाते की, वर-वधूला हळद लावल्यानंतर त्यांनी घराबाहेर पडायचे नसते. यामागे नक्की काय कारण आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हळद लावल्यानंतर वर-वधूने घराबाहेर का पडू नये?
खरं तर, हळद लावल्यानंतर हळदीचा एक विशेष प्रकारचा वास येतो. ज्यामुळे आसपासच्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती वर-वधूकडे आकर्षित होता. असं म्हटलं जातं की, हळदीच्या अंगाला जेव्हा सकारात्मक शक्ती आकर्षित होतात तेव्हा त्या शरीरात दैवी ऊर्जा जागृत करतात तसेच जेव्हा नकारात्मक शक्ती आकर्षित होतात त्या व्यक्तीला कमकुवत बनवतात. नकारात्मक शक्तीच्या प्रभावाने लग्नासारख्या शुभ कार्यात उत्साही वाटत नाही. वर-वधूला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो.
हळद लावल्यानंतर घराबाहेर न पडण्याचे वैज्ञानिक कारण
हळद लावल्यानंतर जास्तीत जास्त सावलीत राहावे. घराबाहेर पडल्यानंतर त्वचा खराब आणि काळी पडते. हळदीमुळे चमकणारी त्वचा निस्तेज होऊ शकते.
हेही वाचा :