घरभक्तीदहीहंडी का साजरी केली जाते? काय आहे महत्व?

दहीहंडी का साजरी केली जाते? काय आहे महत्व?

Subscribe

18 ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल. तर 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी केली जाईल.

श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमी आणि रक्षाबंधननंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. कारण या दिवशी भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यावर्षी गुरूवारी, 18 ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल. तर 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी केली जाईल.

खरंतर हिंदू पुराणानुसार, श्रीकृष्ण देवांचा जन्म मध्य रात्री झाला होता, त्यामुळे कृष्णजन्माष्टमीचा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. तसेच या दिवशी श्रीकृष्णांची पूजा देखील केली जाते. दहीहंडीचा सण देखील साजरा केला जातो.

- Advertisement -

का साजरी केली जाते दहीहंडी?
हिंदु पुराणानुसार, कृष्ण भगवान त्यांच्या लहानपणी अनेक बाल लीला करायचे. त्यांना लोणी खूप प्रिय होत. त्यामुळेच ते वृंदावनातील प्रत्येक घरामधून त्यांच्या मित्रांसोबत लोणी चोरून आणायचे आणि खायचे. त्यामुळे त्यांना माखन चोर या नावाने देखील ओळखलं जातं. परंतु कृष्ण लोणी चोरायचे म्हणून वृंदावनातील गोपिका ते लोणी घरामधील उंचवट्यावर ठेवायच्या. जेणेकरून कृष्ण आणि त्यांच्या मित्रांचा हात तिथे पोहोचला जाऊ नये. अशावेळी कृष्ण भगवान त्यांच्या मित्रांसोबत मिळून पिरामिड आकाराचे एकावर एक धर रचायचे आणि त्यावर चढून श्रीकृष्ण हंडी फोडून लोणी खायचे. तेव्हापासूनच दहीहंडीचा उत्सव सुरू झाला.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये साजरी केली जाते दहीहंडी
महाराष्ट्रात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सुव साजरा केला जातो. यामध्ये पुरूषांसोबतच अनेक महिला देखील सहभाग घेतात. तसेच गुजरातमध्ये देखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते.


हेही वाचा :Hindu Shastra : कृष्ण जन्माष्टमीचं काय आहे महत्त्व? जाणून घ्या कृष्णाष्टमीचा शुभमुहूर्त आणि तिथी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -