Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious शिवपिंडीवर का केला जातो जलाभिषेक?

शिवपिंडीवर का केला जातो जलाभिषेक?

Subscribe

हिंदू धर्म ग्रंथांनुसार, शिवपिंडीवर जलाभिषेक केल्याने अनेक लाभ होतात. सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात.

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा हे अर्पण करतात. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट भगवान शंकरांना अर्पण केली जाते, ती म्हणजे जल(पाणी) जलाभिषेकाशिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्ण मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शंकरांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. हे अभिषेक केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात सुख-समृद्धीचा वावर होतो.

भगवान शंकारांना का प्रिय आहे जलाभिषेक?

mahashivratri 2019 Why Lord Shiva is in linga form and What does the lingam  representहिंदू धर्म ग्रंथांनुसार, शिवपिंडीवर जलाभिषेक केल्याने अनेक लाभ होतात. सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. असं म्हणतात की, जेव्हा समुद्र मंथन झाले होते त्यावेळी महादेवांनी मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले होते. त्यावेळी त्यांना असंख्य वेदना होत होत्या. त्यांना बरं वाटवं म्हणून तेथील उपस्थित देवांनी जल, दूध आणि विविध फळांचा रस त्यांना अर्पण केला. यामुळे महादेवांचा त्रास शांत झाला होता.

- Advertisement -

तेव्हापासूनच भगवान शंकरांना जलाभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली. त्यामुळे भाविक भगवान शंकरांच्या पिंडीवर जल, दूध, फळांच्या रसाचा अभिषेक करतात. मात्र जलाभिषेक महादेवांना अतिशय प्रिय आहे.

जलाभिषेक करताना करा ‘या’ मंत्राचे पठण

  • ॐ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
    उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मामृतात् ।।
  • ॐ नमः शिवाय
- Advertisement -

जलाभिषेक करताना या मंत्राचे पठण केल्यास ते तत्काळ महादेवांच्या चरणापाशी पोहोचते.


हेही वाचा :

Vastu Tips : घरात आर्टिफिशियल फुलांचा वापर केल्याने वाढू शकते नकारात्मकता

- Advertisment -

Manini