ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती शुभ आणि अशुभ योग निर्माण करते. तुम्ही अनेकदा कालसर्प दोषाबद्दल ऐकले असेल. हा दोष बहुतांश व्यक्तींच्या कुंडलीत असतो. या दोषामुळे व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांमधून जावे लागते.
कालसर्प दोष म्हणजे नक्की काय?
ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील राहू आणि केतुच्या वाईट प्रभावामुळे कालसर्प दोष निर्माण होतो. जेव्हा कुंडलीत राहू आणि केतु समोरासमोर येतात. तेव्हा हा दोष निर्माण होतो. ज्योतिष शास्त्रात राहूला काळ या नावाने दर्शवले जाते तर सापाला केतूची देवता मानले जाते. शास्त्रात राहूला सापाचे डोके आणि केतूला सापाची शेपटी असते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा दोष असतो. त्याला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कुटुंबात सतत तणावाचे वातावरण राहते.
कालसर्प दोषावर उपाय
- ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांनी भगवान विष्णूची नियमित पूजा करावी.
- दररोज ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.
- कालसर्प दोष दूर करण्यासाठी वाहत्या पाण्यात मसूर आणि संपूर्ण नारळ टाकल्यास फायदा होईल.
- नियमीत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि भगवान शंकराच्या मूर्तीवर दुध आणि पाणी अर्पण करावे.
- ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प दोष निवारणासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
हेही वाचा :