Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligiousरथ सप्तमी का साजरी केली जाते? वाचा 'ही' पौराणिक कथा

रथ सप्तमी का साजरी केली जाते? वाचा ‘ही’ पौराणिक कथा

Subscribe

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणून साजरा केला जातो. यंदा रथ स्प्तमी 16 फेब्रुवारी 2024 या दिवशी येत आहे. हिंदू धर्मात रथ सप्तमीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

तसेच मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी-कुंकू कार्यक्रमाचा देखील रथ सप्तमी हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी स्नान, दान, होम आणि पूजा केल्यास कित्येक पटीने फलदायी ठरते.

- Advertisement -

रथ सप्तमीची कथा

Rath Saptami 2023 Shubh Muhurat | क्या है रथ सप्तमी | Ratha Saptami Ka Mahatva | ratha saptami 2023 shubh muhurat and significance | HerZindagi

एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शारीरिक सामर्थ्यावर गर्व झाला होता. तो सतत सर्वांचा अपमान करत होता. वाईट वागण्यात तो कधीही मागे हटला नाही. एके दिवशी दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले, तेव्हा ते खूप दुर्बल दिसत होते. त्यांना पाहून, सांब त्यांची चेष्टा करु लागला आणि त्यांचा अपमान करु लागला. सांबच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वासा ऋषींनी त्याला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. त्यानंतर सांबची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्यांला रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सांबने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला. तेव्हापासून रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की, ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात. व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही.

- Advertisement -

अशी करा पूजाविधी

  • या दिवशी सूर्य देवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे.
  • घराच्या बाहेर सात रंगांच्या रांगोळी काढा. त्याच्या मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा.
  • सूर्याला लाल रंगाचे फुल, रोली, अक्षत, दक्षिणा, गुळ चणे वगैरे अर्पण करा.
  • दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा.
  • गहू, गुळ, तीळ, लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या.

हेहा वाचा :

Maghi Ganesh Jayanti : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार माघी गणेश जयंती

- Advertisment -

Manini