Tuesday, February 13, 2024
घरमानिनीReligiousवसंती पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि कथा

वसंती पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि कथा

Subscribe

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रामुख्याने हा सण विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करतात. यादिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात, या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ति बुद्धिमान आणि एकाग्र होतो.

वसंत पंचमी तिथी

हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमी तिथी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 02:41 पासून सुरु होणार असून ती 14 फेब्रुवारी 12:09 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार, वसंत पंचमी 14 फेब्रुवारी साजरी केली जाईल.

- Advertisement -

शुभ मुहूर्त

वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 पासून 12:41 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.

वसंत पंचमी पौराणिक कथा

- Advertisement -

वसंत पंचमीची कथा महाकवि कालिदास यांच्याशी जोडलेली आहे. पौराणिक कथेनुसार, कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यावेळी ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करण्यार त्या पूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना केली.

वसंत पंचमीशी जोडलेल्या आणखी एका कथेनुसार, वसंत पंचमीशीच्या दिवशी देवी सरस्वती पृथ्वीवर प्रकट झाल्या तेव्हा संपूर्ण सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली.


हेही वाचा :

Maghi Ganesh Jayanti : ‘या’ कारणामुळे साजरा केला जातो माघी गणेशोत्सव

- Advertisment -

Manini