Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious हरितालिकेला शिवलिंगाची पूजा का केली जाते? वाचा शुभ मुहूर्त

हरितालिकेला शिवलिंगाची पूजा का केली जाते? वाचा शुभ मुहूर्त

Subscribe

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य, दीर्घायुष्य, सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात, तर कुमारीका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. यंदा 18 सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया असणार आहे. हरतालिकाच्या व्रता दिवशी देवी पार्वतीसोबत गणपती, भगवान शंकर, कार्तिकेय स्वामी यांची देखील पूजा केली जाते.

हरितालिका शुभ मुहूर्त

सोमवार, 18 सप्टेंबर रोजी हरितालिकेचे पूजन केले जाईल. पूजेसाठी सकाळी 06:07 मिनिटापासून ते सकाळी 07:39 मिनिटांपर्यंत आणि संध्याकाळी 04:51 पासून ते 06:23 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.

शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा

- Advertisement -

हरतालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्यानं सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन केल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजणाची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.

पार्वतीच्या पूजनावेळी हा मंत्र उच्चारावा

- Advertisement -

ऊं उमायै नम:
ऊं पार्वत्यै नम:
ऊं जगद्धात्र्यै नम:
ऊं जगत्प्रतिष्ठयै नम:
ऊं शांतिरूपिण्यै नम:
ऊं शिवायै नम:

महादेवाची आराधना करताना हा मंत्र उच्चारावा

ऊं हराय नम:
ऊं महेश्वराय नम:
ऊं शम्भवे नम:
ऊं शूलपाणये नम:
ऊं शिवाय नम:
ऊं पशुपतये नम:
ऊं महादेवाय नम:


हेही वाचा :

हरतालिका व्रत कोणी करावे? वाचा ‘ही’ पौराणिक कथा

- Advertisment -

Manini