घरभक्तीदेवउठनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंसोबत का केली जाते उसाची पूजा?

देवउठनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंसोबत का केली जाते उसाची पूजा?

Subscribe

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं. या वर्षी देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू जवळपास 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होणार आहेत. तसेच मागील चार महिने जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरु होतील. सोबतच देवउठनी एकादशी पासून लग्नसोहळ्या सारखे मांगलिक कार्य देखील सुरु होतील.

देवउठनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंसोबत का केली जाते उसाची पूजा?
तुळशी विवाहामध्ये उसाचा वापर देखील केला जातो. परंतु या दिवशी उसाचे नक्की काय महत्व आहे? खरंतर, भारतातील अनेक राज्यांमध्ये उसाची शेती केली जाते. याचं कारण म्हणजे देवउठनी एकादशी तिथीपासून वातावरणामध्ये हळूहळू अनेक बदल होऊ लागतात. देवउठनी एकादशीनंतर ऊस तोडणीला सुरुवात केली जाते. त्यामुळे देवउठनी एकादशीच्या दिवशी उसाची पूजा करुन शुभ कार्याला सुरुवात केली जाते.हिंदु धर्मामध्ये उसाला आणि त्याच्या गोडव्याला शुभ मानलं जातं. कारण उसापासूनच गूळ, साखर तयार केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, ऊसाची पूजा केल्याने कुटुंबियांमध्ये गोडवा राहतो आणि घरात सुख-समृद्धी येते.

- Advertisement -

देवउठनी एकादशीला करा तुलसी विवाह
चार महिन्यानंतर जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा शालीग्राम/कृष्ण आणि तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतरच इतर लग्नांचे मुहूर्ताची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार, चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टिचे कार्य हाती घेतात. भगवान विष्णूंचा विश्रांती काळ आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून सुरु होतो जो कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीपर्यंत असतो.

 

- Advertisement -

हेही वाचा :

देवउठनी एकादशीला 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार भगवान विष्णू; जाणून घ्या तुळसी विवाहाचे महत्त्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -