Thursday, February 22, 2024
घरमानिनीReligiousआज उत्पत्ती एकादशीला अशी करा श्री विष्णूंची पूजा

आज उत्पत्ती एकादशीला अशी करा श्री विष्णूंची पूजा

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हटले जाते. आज 8 डिसेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाईल. उत्पत्ती एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

उत्पत्ती एकादशी तिथी

उत्पत्ती एकादशीचे व्रत शुक्रवार, 8 डिसेंबर रोजी केले जाईल.
उत्पत्ती एकादशीची सुरुवात : 08 डिसेंबर, सकाळी 05:06 पासून
उत्पत्ती एकादशी समाप्ती : 09 डिसेंबर, संध्याकाळी 06:31 पर्यंत

- Advertisement -

उत्पत्ती एकादशीची अशी करा पूजा

 

- Advertisement -
  • उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

हेही वाचा :

भारतातील ‘ही’ 5 रहस्यमय मंदिरं माहीत आहेत का?

- Advertisment -

Manini