Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! १० वर्षीय मुलीने भाजप नेत्यावर केला लैंगिक छळाचा आरोप

धक्कादायक! १० वर्षीय मुलीने भाजप नेत्यावर केला लैंगिक छळाचा आरोप

Related Story

- Advertisement -

एका १० वर्षीय चिमुकल्या मुलीचे कुटुंबातील सदस्यांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबात भारतीय जनता पक्षातील एका नेत्याचा समावेश आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगरच्या चंदेरीमध्ये घडली आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुलीने आपल्या आईसोबत अशोक नगरच्या महिला ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुलगी आणि आईने असा आरोप केला आहे की, गेल्या काही काळापासून कुटुंबातील सदस्य आणि त्यामध्ये भाजपचा एक बडा नेता मुलीसोबत गलिच्छ वर्तणूक करत होते. शनिवारी ४ सप्टेंबरला मुलगी आपल्या आईसोबत अशोकनगर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने सर्व घटना पोलिसांना सांगितले. पीडित मुलगी आरोपी भाजप नेत्याच्या भावाची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. परंतु संपूर्ण प्रकरण कुठेतरी लपवत असल्याचे दिसत आहे. घटना हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी डीएसआरमध्ये देखील दाखवले नाही. तसेच आरोपींना पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही आहे. पण पोलिसात तक्रार दाखल होताच उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. कारण याप्रकरणात भाजपच्या एका बड्या नेत्याचे नाव जोडले गेले आहे.

दरम्यान ज्या भाजप नेत्यावर आरोप करण्यात आला आहे, तो यापूर्वी काँग्रेसमध्ये होता. अलीकडेच तो बड्या नेत्यासोबत भाजपमध्ये सामील झाला होता. चंदेरीमध्ये या नेत्याचा चांगला प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही भाजपवर आरोप करण्याबरोबरच मुलीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आरोपींना अटक होईल की अल्पवयीन मुलीला आपल्या न्याय मिळवण्यासाठी आईसोबत भटकावे लागेल, हे येत्या काळात कळेल.


- Advertisement -

हेही वाचा – पती,पत्नीची मुलीसह आत्महत्या


 

- Advertisement -