घरताज्या घडामोडीएसटी अपघातात ११ जखमी, महाड तालुक्यातील शिंदेकोंड गावातील दुर्घटना

एसटी अपघातात ११ जखमी, महाड तालुक्यातील शिंदेकोंड गावातील दुर्घटना

Subscribe

ही बस पोलादपूरहून महाडकडे येत होती.

महाड तालुक्यात शिंदेकोंड गावात एसटीची निमआराम बस कंटेनरवर आदळली असून, या अपघात ११ जण जखमी झाले आहेत. बुधवारी २३ संप्टेंबरला सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिंदेकोंड गाव हद्दीत ही दुर्घटना घडली. ही बस पोलादपूरहून महाडकडे येत होती. अपघातानंतर कंटेनर पुढे निघून गेला. या अपघातात वैशाली सुनील चव्हाण (खेड), अशोक बापू तिवारी (पिंपरी- चिंचवड), अनंत बबन झोरे (पुणे), भरत वसंत चव्हाण (खेड), आनंदीबाई रामदास माने (पुणे), नंदिनी समीर शिंदे (मुंबई), सुमन अनंत पवार (भोसरी- पुणे), रामदास पांडुरंग कदम (पुणे), रोशनी राजन घोलप (पुणे), रवींद्र गणपत पिंपळकर (पुणे), विनोद सोनू खांबे (महाड) जखमी झाले आहेत. हयगय आणि वेगाने वाहन चालविल्या प्रकरणी एसटी बसचा चालक अरुण नारायण जाधव याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले

मुंबई–गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, वारंवार हा प्रश्न उपस्थित करुनही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर मागील ११ वर्षात सुमारे साडेतीन हजार अपघात होऊन अनेकांचा बळी गेलेला आहे. अशा नाकर्त्या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवून अपघातात मृत्यू पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून खड्डेमुक्त महामार्गाच्या मागणीसाठी कोकण हायवे समन्वय समिती, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था कोकण कट्टा रायगड जिल्हा मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह संघटणेच्या वतीने मानवी श्रद्धांजली साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आंदोलनेही झाली. शिवाय  मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा दावा करत अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, खंडपीठाने आपली नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

- Advertisement -

 


हे ही वाचा – नव्या विक्रमापासून रोहित शर्मा केवळ ३ षटकार दूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -