Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम संतापजनक! दोन बहिणींचे अपहरण करून १५ जणांनी सहा दिवस केला बलात्कार

संतापजनक! दोन बहिणींचे अपहरण करून १५ जणांनी सहा दिवस केला बलात्कार

Related Story

- Advertisement -

दोन बहिणींचे अपहरण करून १५ जणांनी सहा दिवस बलात्कार
केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना पाकिस्तानमधे घडली आहे. एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीवर सहा दिवस बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या पीडित मुलींचे वय १५ वर्ष आणि १७ वर्ष असे सांगितले गेले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानीमधील नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

नक्की काय घडले?

- Advertisement -

पीडित मुलींच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी दोन बहिणीचे अपहरण केले होते. मुलींना फैसलाबाद परिसरात ठेवण्यात आले होते. आरोपी मुलींना नशेत ठेवत असतं. एवढंच नव्हे तर या पीडित मुलींचे आशेपार्ह फोटो आणि व्हिडिओ देखील काढतं असतं. पण गरीबी असल्यामुळे ते कायदेशीर कारवाई करू शकले नाहीत. म्हणून त्यांनी दुसरीकडे राहायला जाण्याचा मार्ग स्वीकारला. पण या घटनेनंतरही आरोपींनी मुलींचा पाठलाग केला.

Geo.tv च्या अहवालानुसार, या प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा दिवसांत मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, असे सांगितले जात आहे. तसेच FIR नुसार, घटनेनंतर १५ वर्षाच्या मुलीला फैसलाबादमधील जंग बाजार येथे सोडण्यात आले होते. तर दुसऱ्या मुलीला गुजरानवाला येथे सोडण्यात आले होते.

- Advertisement -

 

- Advertisement -