घरठाणेसंतापजनक : डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संतापजनक : डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Subscribe

मागील ९ महिन्यात ३० जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना

साकीनाका येथील महिलेवर अमानुष अमानवीय शारीरिककृत्य केल्याच्या प्रकरणाची धग विझत नसतानाच मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सागाव येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या २९ जानेवारीपासून २२ सप्टेंबरपर्यंत सतत ब्लॅकमेलिंग करीत परिसरातील तीस नराधमांनी सतत आठ महिने सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उजेडात आले असून, डोंबिवली परिसरात या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून, मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार सुरू असताना अखेर पीडित तरुणीने तिच्यासोबत होणाऱ्या या प्रकाराला कुटूंबासमोर वाचा फोडली. बुधवारी रात्री कुटुंब पीडित मुलीला घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली.

नेमके काय झाले ?

या पीडित मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याचा फायदा घेत या तरुणाने जानेवारी महिन्यात या तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर हा व्हिडीओ आपल्या मित्राला दिला असता त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्राला व्हिडीओ पाठवला असे करता करता ९ महिन्यात या व्हिडीओच्या माध्यमातून ३० जणांनी पीडित मुलीला धमकावून तिच्यावर बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन अत्याचार केला. नांदिवली टेकडी, डोंबिवली पूर्व, देसले पाडा, रबाळे नवी मुंबई, मुरबाड येथील फार्म हाऊस, कोळेगाव बदलापूर सर्कल अशा विविध ठिकाणी पीडित मुलीला घेऊन जात तिच्या मनाविरुद्ध जबरी संभोग हे तरुण करीत होते.

- Advertisement -

अमली पदार्थांचे व्यसन लावून अत्याचार?

१५ वर्षीय पीडित मुलीला गॅंग रेप करणाऱ्यांनी व्यसनाधीन बनवले असल्याचे विश्वसनीय वृत्त असून विविध प्रकारचे अमली पदार्थ देत तिला व्यसनाची सवय लावली गेली होती. एकीकडे ब्लॅकमेलिंग व अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पीडिताला आमिष दाखवून ३० जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जात सामूहिक बलात्कार केल्याचे बोलले जात आहे.

३० जणांचा सामूहिक बलात्कार

देशभरात वेगवेगळ्या स्वरूपाचे बलात्कार कांड घडताना दिसून येत असून ३० जणांचा सामूहिक बलात्कार एका अल्पवयीन मुलीवर झाल्याचे उघड झाल्याने महाराष्ट्र पुरोगामी विचाराच्या राज्याला मात्र या प्रकरणाने कलंकित करून टाकले आहे.

- Advertisement -

हेच ते ३० नराधम

विजय फुके, चेतन राठोड, भावेश मस्के, तुषार कसबे, पिंटू पाल, सुमित तायडे, स्वप्नील कदम, साहिल म्हात्रे,जय शेंडगे, गौरव माळी, धीरज पाटील, तनिष सोनावणे, आशिष गायकवाड, अतिश गायकवाड, वैभव गायकवाड, अनुप , अक्षय पवार, दीपक सपकाळ, रजनीश यादव, योगेश, ओमकार गुंजल, कैलास गायकवाड, प्रसाद भिसे, राहुल , संदीप आघव, सुरज पाटील, दर्शन जाधव, जितेश पावशे, अशोक , भावेश म्हस्के.

२२ आरोपी अटकेत

मानपाडा पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करून तिच्या जबाबवरून २९ जणांविरुद्ध सामूहिक अत्याचार, धमकी देणे, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्रीच आरोपीची धरपकड करीत २२ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेजण अल्पवयीन असून, त्यांना भिवंडी येथील बालसुधार गृह येथे पाठवण्यात आले आहे. तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढोले करीत आहेत.

वार्ताहर, कल्याण- सिद्धार्थ गायकवाड


हे ही वाचा – Navi Mumbai International Airport : बीएनएचएसच्या अहवालात पाणथळातल्या पक्ष्यांना धोका असल्याचे गंभीर निष्कर्ष


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -