घरCORONA UPDATECorona Update: करोना रोखण्यासाठी केंद्राकडून १५ हजार कोटींची तरतूद

Corona Update: करोना रोखण्यासाठी केंद्राकडून १५ हजार कोटींची तरतूद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोनाला घालवायचे असेल तर त्याचा संसर्ग रोखणे हाच एकमेव पर्याय असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. तसेच करोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींची तरतूद केली असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. आज संध्याकाळी ८ वाजता देशवासियांना संबोधित करत असताना त्यांनी ही घोषणा केली.

- Advertisement -

या निधीतून करोना टेस्ट किट उपलब्ध करुन देणे, आयसोलेशन बेड, अतिदक्षता विभाग तयार करणे, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणे, तसेच पॅरा मेडिकल स्टाफला प्रशिक्षित करणे, अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

तसेच सर्व राज्य सरकारांना फक्त आरोग्य सेवेवरच लक्ष ठेवण्यास सांगितले असल्याचे मोदींनी सांगितले.
खासगी क्षेत्र देखील देश वासियांच्या सेवेसाठी लागला आहे, याचा मला आनंद वाटत आहे.

- Advertisement -

करोना सारख्या संकटाच्या काळात अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. त्यामुळे कोणतीही अफवा आणि अंधविश्वासापासून तुम्ही लांब रहा आणि केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये, असे आवाहन मोदींनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -