घरताज्या घडामोडीLive Update: मुंबई २४ तासांत आढळले ४३४ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबई २४ तासांत आढळले ४३४ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत ४३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९९ हजार ३२३वर पोहोचली आहे. यामधील ११ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ७९ हजार ८८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

कामगार नेते सूर्यकांत व्यं. महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सूर्यकांत महाडिक झेन हाॅस्पिटलमध्ये रात्री ८.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.


महाराष्ट्रामधील भंडारा रुग्णालयातील भीषण आगीत प्राण गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपये, पंतप्रधानांद्वारे जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत २ हजार ४३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ हजार २८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ७१ हजार ५५२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ लाख ६७ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


दंगल गर्ल बबीता फोगाट आई झाली आहे. बबीता फोगाट आणि विवेक सुहाग यांना पुत्ररत्न प्राप्त झाला आहे.


खारघरमध्ये दक्षिण आफ्रिका कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण ठाण्यातील आणि एक रुग्ण रायगडमधील असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही घातक E484K म्युटेशन आहे.


सीरम इन्स्टिट्यूटची लस पर्चेस करण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.


विराट अनुष्काला कन्यारत्न झाले आहे. दोघांनाही त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने ट्विट करून हि खुशखबर चाहत्यांनी दिली आहे.



भंडारा मृत बालकांच्या कुटुंबीयांना पीएम राष्ट्रीय फंडातून २ लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना ५० हजार रूपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे. ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.


MPSC परिक्षांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. १४ मार्चला MPSC राज्यसेवेची पूर्व परिक्षा होणार आहे. २७ मार्चला अभियांत्रिकीची पूर्व परिक्षा होणार आहे.


मुंबईतील फेमस मुच्छड पानावाला याला एनसीबीकडून फर्निचर प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे.


शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.


देशात कोरोनाचे नवे १६ हजार ३११ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. नव्या रूग्णांची नोंद झाली असली तरी देशात १९ हजार २९९ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासात देशभरात १६१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -