Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे शाब्बास! २० वर्षांपासूनचा 'बार' बंद पाडला, अन् सुरू केलं 'हॉस्पिटल'

शाब्बास! २० वर्षांपासूनचा ‘बार’ बंद पाडला, अन् सुरू केलं ‘हॉस्पिटल’

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा फटका शेतकरी, व्यापारी, नागरिक, विविध व्यवसायसह हॉटेल, बार, रेस्ट्रॉरंट या सर्वांनाच बसला आहे. दरम्यान भिवंडी शहरातील पद्मानगर येथील २० वर्षांपासून सुरू असलेला ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करून २५ बेडचे भव्य स्नेजोस- मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरू केल्याने परिसरातील दोन लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आबासाहेब निंबाळकर मानव विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे निंबाळकर यांनी २० वर्ष जुना ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करून स्नेजोस-मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून हे हॉस्पिटल सुरू होणार आहे. या हॉस्पिटल स्पेशालीटीमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा, जीनेकोलॉजिकल शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक सर्जरी, कान, नाक, घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, फिजिओथेरपी, मधुमेह आदी सुविधा मिळणार आहे.

- Advertisement -

या स्नेजोस – मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलचे उद्घाटन शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे ऑनलाईन करणार आहेत. तर महापौर प्रतिभा विलास पाटील फित कापून, नारळ वाढवून हॉस्पिटल सुरू करणार आहे. या हॉस्पिटलमध्ये २५ बेड असून डॉ. समीर लटके, डॉ. तृप्ती दिनकर, डॉ. पुनीत कुमार गुप्ता, डॉ. श्यामसुंदर वर्मा, डॉ. शशिकांत मशाल, डॉ. स्नेहा वाघेला, डॉ. शिवरंजनी पुराणिक, डॉ. शाहिस्ता मन्सुरी अशी १० डॉक्टरांची टीम असून १८ स्टाफ राहणार आहे. सर्व सुविधा असणाऱ्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील तब्बल दोन लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -