Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम यूपीतल्या 'एका छोट्याशा लव्हस्टोरी'चा दी एन्ड झाला भिवंडीत

यूपीतल्या ‘एका छोट्याशा लव्हस्टोरी’चा दी एन्ड झाला भिवंडीत

Related Story

- Advertisement -

१३ वर्षांच्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या १४ वर्षांच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या करून या छोट्याशा लव्ह स्टोरीचा दी एन्ड करणाऱ्या २० वर्षांच्या भावाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडवून दिली आहे.

विजय गुप्ता (काल्पनिक नाव) असे या छोट्याश्या प्रेमाचा अंत करणाऱ्याचे नाव आहे. अजय हा मूळचा उत्तर प्रदेश मधील बस्ती जिल्हा येथे राहणारा असून सध्या तो नालासोपारा येथे राहण्यास होता. त्याला १३ वर्षांची बहीण असून ती आई वडिलांसह गावीच राहण्यास असते. अजयच्या बहिणीचे त्याच गावातील १४ वर्षांच्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होते आणि तो १४ वर्षांचा मुलगा भिवंडीतील कामतघर या ठिकाणी काम करून तिथेच राहत होता.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये गावी गेलेला हा १४ वर्षांचा प्रेमवीर हा आपल्या प्रेयसीला भेटत होता आणि दोघांनी लग्न करून मुंबईत पळून येण्याचा विचार देखील केला होता. मात्र याची कुणकुण मुलीच्या वडिलांना लागली आणि त्याने मुलीच्या प्रियकराला घरी बोलावून जाब विचारला असता दोघात भांडणे झाली. त्यानंतर हा प्रेमवीर भिवंडीत कामाच्या ठिकाणी निघून आला होता.

या दोघांच्या प्रेमाची स्टोरी नालासोपारा येथे राहणाऱ्या मुलीच्या भावाला कळली असता त्याने या लव्ह स्टोरीचा दी एन्ड करण्याचे ठरवले. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विजय हा भिवंडीत आला आणि त्याने बहिणीचा १४ वर्षांचा प्रियकराला भेटण्यासाठी गुंदवली, दापोडा रोड श्रीजी इंटरनॅशन कंपनीच्या गोदामाच्या मागे बोलावून त्याची धारदार शस्त्राने हत्या करून पोबारा केला.

- Advertisement -

दुसऱ्या दिवशी नारपोली पोलिसांना या मुलाचा मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवून गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करून नारपोली पोलिसांनी २० वर्षांचा विजय याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकणी विजयला अटक करण्यात आली असून पुढील तपास नारपोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विजय शिरसाठ करीत आहे.


हेही वाचा – धक्कादायक! विडी न दिल्यामुळे ३ लोकांनी बेदम मारहाण करुन कामगाराची केली हत्या!


 

- Advertisement -