घरताज्या घडामोडी२६/११ सारखा हल्ला पुन्हा होणे अशक्य

२६/११ सारखा हल्ला पुन्हा होणे अशक्य

Subscribe

१२ वर्षांपूर्वी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेत बदल करण्याच्या दिशेने विचार करण्यास भाग पाडले होते. १२ वर्षांचा कालावधी हा खूप मोठा असतो. परंतु २६/११ सारखी घटना स्वाभिमानी देश कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी दहशतवादाने देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते. मात्र, २६/११ सारखा हल्ला आता भारताच्या भूमीवर होणे अशक्य आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. हिंदुस्तान टाईम्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आज देशात राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अनेक बदल करण्यात आले आहे. आम्ही त्यामुळे देशवासीयांना देशातील अंतर्गत आणि सीमांवरील संरक्षण अधिक मजबूत केले असल्याचा विश्वास देऊ शकतो. आता २६/११ सारखा हल्ला पुन्हा भारताच्या भूमीवर करणे अशक्य आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. जेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे तेव्हापासून काही भारत विरोधी शक्तींनी सीमांवर आणि सीमांद्वारे घुसखोरी करून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या सहा वर्षांमध्ये दहशतवादाविरोधात मोठा बदल झाला आहे आणि तो म्हणजे त्याला प्रत्युत्तर देणे. यापूर्वी काय व्हायचे? दहशतवादी हल्ले व्हायचे, आपले जवान त्यांना प्रत्युत्तर देत होते आणि पाकिस्तानकडे बोट दाखवणारे सर्व पुरावेही आपल्याला मिळत होते, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आता भारत देशाच्या सीमेच्या आत कारवाई करत आहे. परंतु गरज भासल्यास सीमा पार करूनही दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट करण्याचे काम आपले शूर जवान करत आहेत. पाकिस्तानचा भारताविरोधातील दहशतवादाचं मॉडेल आता उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. भारताने पाकिस्तानचं ‘नर्सरी ऑफ टेररिझम’ हे रूप जगासमोर आणलं आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -