घरताज्या घडामोडीवाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशी काळाची झडप

वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशी काळाची झडप

Subscribe

गुजरातच्या भावनगर येथून बसने येणारे साड्याचे पार्सलची वाट पहाणार्‍या २६ वर्षीय तरुणीचा मेट्रोचा गर्डर घेऊन जाणार्‍या क्रेन(एक्सल पुलर)च्या अपघातात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंधेरी पूर्व गुंदवली बस थांब्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचा आदल्यादिवशीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तिच्या अशा अपघाती मृत्यूमुळे ती राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फाल्गुनी पटेल (२६)असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. फाल्गुनी ही सकिनाक्यातील चांदीवली परिसरात कुटुंबासोबत राहत होती. एका खाजगी कंपनीत नोकरी करणार्‍या फाल्गुनीचा ३०ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. शनिवारी सकाळी गुजरातमधून आलेले साड्यांचे पार्सल घेण्यासाठी फाल्गुनी आपली चुलत बहीण तुलसी (३२)सोबत अंधेरी पूर्व येथील गुंदवली बस थांब्यावर थांबल्या होत्या.

- Advertisement -

त्याचवेळी जोगेश्वरी येथून दादरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला मेट्रो-२ कामाचा गर्डर वाहून नेणारा एक्सल पुलर (क्रेन) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने पुलरला जोडलेली ट्रॉली वेगळी होऊन फाल्गुनी हिच्या अंगावर पडली. ट्रॉलीखाली दबली गेल्यामुळे फाल्गुणीचा जागीच मृत्यू झाला. फाल्गुणीची चुलत तुलसी जखमी झाली असून एक रिक्षा आणि एका स्कुटीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर एक्सल पुलर चालक फरार झाला असून घटनास्थळी दाखल झालेल्या अंधेरी पोलिसांनी दुसर्‍या क्रेनच्या मदतीने ट्रॉलीखालील फाल्गुणीचा मृतदेह बाहेर काढला. ताब्यात घेऊन जखमी झालेल्या तुलसीला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी पुलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -