घरCORONA UPDATEभिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

भिवंडीच्या या आश्रम शाळेत एकूण ४७० विद्यार्थी होते. त्यातील ३० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आश्रमातील इतर विद्यार्थ्यांची चाचणी सुरू असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये २३ मुली, ५ मुले व दोन कर्मचारी आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भिवंडीतील १४ मुली आणि ४ मुलांचा समावेश आहे. या आश्रमशाळेतील मुलांना सर्दी, तापाची लक्षणे आढळून आल्याने चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी १९८ विद्यार्थ्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली त्यात ३० विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

भिवंडीच्या या आश्रम शाळेत एकूण ४७० विद्यार्थी होते. त्यातील ३० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आश्रमातील इतर विद्यार्थ्यांची चाचणी सुरू असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ३० विद्यार्थ्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी संपूर्ण परिसरात पसरल्यानंतर मुलांच्या पालकांनी शाळेबाहेर मोठी गर्दी केली आणि पालक मुलांना शाळेतून घरी घेऊन गेले आहेत. त्यामुळे काही मुलांची चाचणी करणे बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ठाण्यात सोमवारी एकूण २,०८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांमधील १५६ रुग्ण हे ठाण्यातील असून ७६२ रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर ५१२ रुग्ण हे नवी मुंबई मनपा क्षेत्रातील आहेत. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील २३८ रुग्ण तर ३५ रग्ण हे उल्हासनगर येथील आहेत.

भिवंडी निजामपूर पालिका क्षेत्रातील १४ रुग्ण आहेत. तर मिरा भाईंदर पालिका क्षेत्रातील एकूण ३६७ रुग्ण आहेत. ठाण्याप्रमाणेच पालघरमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. पालघरमध्ये सोमवारी ३६ रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

पहिल्याच दिवशी १५ ते १८ वयोगटातील ६,६८५ मुलांचे लसीकरण पूर्ण

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपरिषद भागात सोमवारी सुरू करण्यात आलेल्या १५ ते १८ वयोगटातील ६,६८५ मुला-मुलींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या १६ लसीकरण केंद्रात आज पहिल्याच दिवशी ३,४८५ मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून लसीकरण मोहिमेंतर्गत एकूण २४ लाख ९३ हजार ७६१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
तर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपरिषद भागात दिवसभरात सुमारे १५ केंद्रांवर ३,१६४ मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले.


हेही वाचा – ठाण्यातील शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -