Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE ठाणे शहराची परिस्थिती भयानक, १७ दिवसात मुख्य स्मशानभूमीत ३८३ जणांवर अंत्यसंस्कार

ठाणे शहराची परिस्थिती भयानक, १७ दिवसात मुख्य स्मशानभूमीत ३८३ जणांवर अंत्यसंस्कार

१ ते १७ एप्रिलच्या दरम्यान ठाण्यातील मुख्य स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यु झालेल्या ३८३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची आकडेवारी समोर आली

Related Story

- Advertisement -

ठाणे शहराची परिस्थिती भयानक होत चालली आहे. जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिनेच्या तुलनेत एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णाची त्याचबरोबर मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १ ते १७ एप्रिलच्या दरम्यान ठाण्यातील मुख्य स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यु झालेल्या ३८३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी केवळ एका स्मशान भूमीची आहे.  ठाण्यात इतर स्मशानभूमीत कोरोनाने दगावलेल्या किती जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना राज्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. कोणी बेड मिळवण्यासाठी धडपड करीत आहे, तर कोणी रेमडीसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपडत आहे. ठाणे शहरात देखील कोरोनाची भयानक परिस्थिती असून ठाण्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांनी भरले आहेत. त्याच बरोबर कोरोनामुळे दगावलेल्याचा आकडा देखील वाढत असून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत वाट पहावी लागत आहे. ठाणे शहरातील स्मशानभूमीमागील काही दिवसांपासून २४ तास धगधगत आहे.

- Advertisement -

ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेली जवाहरबाग स्मशानभूमी मागील १७ दिवसात (१ ते १७ एप्रिल २०२१) कोरोनाने दगावलेल्या ३८३जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ही आकडेवारी स्मशानभूमीच्या नोंदवहीत नमूद करण्यात आलेली आहे. या स्मशानभूमीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचे काही दिवस १४ ते १५ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होती, दिवसागणिक हा आकडा वाढत जाऊन ३०ते ४०च्या मृतदेह दररोज अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत येत आहे.
जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात केवळ १५३ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. एप्रिल महिण्यात ही आकडेवारी कित्येकपटीने वाढल्याचे आकडेवारी वरून लक्षात येत आहे.

ठाणे महापालिकेने तीन स्मशानभूमीमध्ये कोविडच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या जवाहरबाग स्मशानभूमी, कळवा येथील स्मशानभूमी तसेच वागळे स्मशानभुमीचा समावेश करण्यात आला आहे. १ ते ११ एप्रिल या ११ दिवसात कळवा स्मशानभूमी १०३ आणि वागळे स्मशानभूमीत १४७ मृत्यूची नोंद झाली आहे. स्मशानभुमीत काम करणाऱ्या कामगारांशी या संदर्भात चर्चा केली असता, जेव्हा पासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून कामाचा ताण वाढल्याचे त्यांच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होते.

- Advertisement -

मनीषा नगर स्मशानभूमी – १०३ (१ ते ११ एप्रिल)
मुख्य स्मशान भूमी (जवाहरबाग) – ३८३ (१ ते १७ एप्रिल)
वागळे स्मशान भूमी – १४७ (१ ते ११ एप्रिल)

कोविड संशियत मृतदेह स्मशानभूमीत जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील आकडेवारी ही जास्त दिसत आहे. परंतु कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी महापालिकेने जाहीर केलेली आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात नाही अशी प्रतिक्रिया ठामपा उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.


हेही वाचा – Video: हळदीला DJच्या तालावर बैलांसह वऱ्हाड्यांचे धुमशान, कोरोनाचे नियम मोडल्याने नवरदेवावर कारवाई

- Advertisement -