Thane: ठाण्यात झाड पडून चार कारचे नुकसान

मध्यरात्री दोन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. यामध्ये त्या चारचाकी वाहनांसह सुमारे ३ ते ४ फूट कंपाउंड वॉलचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

4 cars damaged due to falling tree in Thane
4 cars damaged due to falling tree in Thane

लोकमान्य नगर परिसरातील रुणवाल प्लाझा सोसायटीसमोर, कोरस टॉवरजवळ, पी.एल. देशपांडे रोडवर पार्क केलेल्या चार वाहनांवर झाड उन्मळून पडल्याची घटना मध्यरात्री दोन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. यामध्ये त्या चारचाकी वाहनांसह सुमारे ३ ते ४ फूट कंपाउंड वॉलचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. लोकमान्य नगर येथे गाड्यांवर झाड पडल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि वर्तकनगर पोलिसांनी धाव घेतली. तातडीने झाड हटविण्यात आल्याने रस्ता वाहनांसाठी मोकळा केला. मात्र पडलेल्या झाडामुळे ४ चारचाकी वाहनांचे आणि सुमारे ३ ते ४ फूट कंपाउंड वॉलचे ही नुकसान झाले आहे. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.


हेही वाचा – पक्षनिष्ठेबाबत मला शिकवण्याची गरज नाही!