रायगड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेतून ४ खेळाडूंची महाराष्ट्र वेस्ट झोनसाठी निवड

4 players selected from Raigad Premier League for Maharashtra West Zone
रायगड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेतून ४ खेळाडूंची महाराष्ट्र वेस्ट झोनसाठी निवड

चर्चेत आलेल्या रायगड प्रीमिअर लीग पंचवीस वर्षांखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत चमकलेल्या चार खेळाडूंची महाराष्ट्र वेस्ट झोनसाठी निवड झाली आहे. लीगचे हे सामने उरणच्या जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी पाताळगंगा येथील एनआयएसएम क्रिकेट मैदानावर सुरू आहेत.लीगच्या या स्पर्धेत कामगिरी करणार्‍या प्रतीक म्हात्रे, हृषीकेश राऊत, सिद्धार्थ म्हात्रे आणि रितेश तिवारी चार खेळाडूंची निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंचवीस वर्षांखालील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेतूनच महाराष्ट्राचा पंचवीस वर्षा खालील क्रिकेट संघ बीसीसीआय आयोजित “सी.के. नायडू” क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.

रायगड जिल्ह्यातून निवड झालेल्या चार खेळाडूंचे रायगड प्रीमियर लिग समितीचे अध्यक्ष राजेश पाटील, रायगड जिल्ह्या क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदिप नाईक,आरपीएलचे सचिव जयंत नाईक, उपाध्यक्ष आनंत घरत, डॉ.राजाराम हुलवान,खजिनदार कौस्तुभ जोशी,अँड.पंकज पंडित,शंकर दळवी,संदिप जोशी यांच्यासह रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व रायगड प्रीमियर लीग सदस्यांनी अभिनंदन केले. भविष्यात रायगड जिल्ह्यात तरुण होतकरू क्रिकेटपटूंसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातूनच रायगडमधील खेळाडूंचा समावेश राज्य आणि राष्ट्रीय संघात होण्यास मदत होईल, असे रायगड जिल्हा क्रिकेट आसो.चे कार्याध्यक्ष जयंत नाईक यांनी सांगितले.


हे ही वाचा – Kolhapur Drug Case : कोल्हापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंस याला