घरताज्या घडामोडीपीकअप गाडीचा माथेरान घाटात अपघात ४ मजुर जखमी, एकाला गंभीर दुखापत

पीकअप गाडीचा माथेरान घाटात अपघात ४ मजुर जखमी, एकाला गंभीर दुखापत

Subscribe

कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सध्या पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये अनेक ठिकाणी MMRDA अंतर्गत विकास कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ येथील आजुबाजुच्या परिसरात राहणारे आदिवासी वाड्यातील बांधवांना संबंधित ठेकेदार मजुरीकरीता  माथेरानला घेऊन येत असतात. आज ६ ऑगस्टच्या दिवशी MMRDA च्या कामांसाठी लागणाऱ्या मजुरांनी खचाखच भरलेल्या MH 47 Y 9572 नंबर प्लेट असलेल्या पीक अप वाहनाला सकाळी ९ वाजताच्या सुमारास अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
नेहमी प्रमाणे  नेरळहुन माथेरान येथे मजुरांनी भरलेले पीक अप वाहन घाटातून  जात असताना ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सदर वाहन उतारावर मागे येत असल्याचे लक्षात येताच वाहनातून प्रवास करणाऱ्या मजुरांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्यासाठी मागे जात असलेल्या चालत्या वाहनातून काहींनी उड्या मारल्या या वाहनामध्ये एकुण २० ते २५ मजुर असल्याचे समजते.त्यातील दोघा तिघांना कीरकोळ दुखापत झाली आहे. तर एकाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.असे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सदर प्रकारामुळे  जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते.यावेळी पीक अप डाव्या बाजूला येऊन धडकल्यामुळे दरीत कोसळण्यापासून वाचल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
                                                                                                 -दिनेश सुतार,माथेरान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -