घरठाणेठाणे: परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांत केलं जातंय 'निगेटिव्ह'

ठाणे: परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांत केलं जातंय ‘निगेटिव्ह’

Subscribe

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आता हाच अंदाज प्रत्यक्षात खरा होताना दिसत आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या राज्यात हळूहळू निर्बंध लावले जात आहेत. गुजरात, दिल्ली, गोवा आणि राजस्थान या राज्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून RT-PCR चाचणी करण्यास बंधनकारक केले आहे. पण ठाण्यात परराज्यातून येणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन तसेच सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम यांनी ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडून ५०० रुपये घेऊन त्यांची कोरोना चाचणी न करता सोडले जात आहे. ठाण्यातील रिक्षा चालकांना हाताशी घेऊन असे काम केले जात आहे. तसेच याप्रकरणात ठाण्यातील स्टेशन येथील कोरोना चाचणी करणारे डॉक्टर देखील सामील आहेत. मनसेचे महेश कदम यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करून या डॉक्टरांचा पर्दाफाश केला आहे. यासंदर्भातील महेश कदम यांचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्यात मंगळवारी दिवसभरात ५ हजार ४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ लाख ८९ हजार ८०० झाली आहे. राज्यात ८३ हजार २२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच काल राज्यात ३० कोरोना बधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.


हेही वाचा – अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – उद्धव ठाकरे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -