घरक्राइमअमानुषता! भाऊ-भावजयकडून सात वर्षांच्या बहिणीचा छळ; प्रायव्हेट पार्टमध्ये टाकायचे मिरची

अमानुषता! भाऊ-भावजयकडून सात वर्षांच्या बहिणीचा छळ; प्रायव्हेट पार्टमध्ये टाकायचे मिरची

Subscribe

आई-वडील नसलेल्या मुलीसोबत चुलत भाऊ आणि वहिनीने असे काही कृत्य केले, ज्यामुळे ते पाहून अंगावर शहारे येतील. ही घटना राजस्थानच्या राजसमंदमध्ये घडली आहे. सात वर्षांची निरागस मुलगी ही आपल्या चुलत भावाकडे राहत होती. पण चुलत भाऊ आणि वहिनीने त्या मुलीचा अक्षरशः छळ मांडला. मुलगी घरात काम करत नसल्यामुळे तिला अमानुषतेपणे मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशाप्रकारे दादा-वहिनी करत होते छळ 

आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पत्नीसोबत ते गुजरातच्या सुरतमध्ये मजदूरीसाठी गेले होते. त्यावेळेस वडिलांनी आपल्या मुलीला चुलत भाऊ आणि वहिनीच्या हातात दिले. पण हे दोघे जण सकाळपासून रात्रीपर्यंत मुलीकडून काम करून घेत होते. सात वर्षांच्या निरागस मुलीने काम केले नाहीतर तिला नग्न करून उलटे लटकवले जात होते आणि नंतर एखाद्या गरम वस्तूने आणि सिगारेटने अंगावर चटके दिले जात होते. एवढेच नाही तर चुलत भाऊ आणि वहिनीचे हे सर्व करूनही मन भरत नव्हते. ते रागाच्या भरात निरागस मुलीचे नख देखील उपटत होते. तसेच ते दोघेही मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये मिर्ची पण टाकत होते.

- Advertisement -

पोलिसांचा खरा चेहरा आला समोर

मागील तीन महिन्यापासून मुलगी हा अमानुष छळ सहन करत होती. पण अखेर मुलीने पोलीस ठाणे गाठले. पण पोलीस ठाण्यात कठोर हृदय असलेले पोलीस बसले होते. तिचे आरोप ऐकण्याऐवजी तिला तिथून पळवून लावले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ करून तो व्हायरल केला. तेव्हा पोलीस पुढे आणि आणि आरोपी चुलत भाऊ आणि वहिनीला अटक केली. पोलिसांनी आरोपी किशन आणि त्याची पत्नी रेखाला अटक केली आहे. पण याप्रकरणामुळे पोलिसांचा असंवेदनशील चेहरा समोर आला आहे, जेव्हा निरागस मुलीला तक्रार दाखल करण्यासाठी ८ तास ठाण्यात बसवून ठेवले होते.

भीमा ठाणे क्षेत्रातील पेलाडोल गावात राहणाऱ्या या मुलीवर झालेल्या छळाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाईल्डलाईनचे सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलीची तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

पोलीस ठाण्याचे अधिकारी गजेंद्र सिंह म्हणाले की, ‘मुलीला तिचे आई-वडील नातेवाईकांकडे सोडून गुजरातला मजदूरीसाठी गेले होते. येथे मुलगी नातेवाईकांच्या घरी घरकाम करत होती. परंतु कामात काही चुक झाली तर नातेवाईक अमानुषपणे मारहाण करत होते. गेल्या तीन महिन्यापासून या लोकांनी मुलीला बंद केले होते. छोट्याशा चुकीमुळे मुलीला उलट लटकवून मारहाण केली जात होती. शिवाय शरीरावर सिगारेटचे चटके दिले जात होते. सध्या पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून कारवाई केली जात आहे.’


हेही वाचा – Viral Video : पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -