घरक्राइमधक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर सलग आठ दिवस नऊ जणांनी केला बलात्कार

धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर सलग आठ दिवस नऊ जणांनी केला बलात्कार

Subscribe

याप्रकरणातील दोन जण अल्पवयीन आरोपींसह चार जणांना अटक करण्यात आली

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने जगभरात सर्व नारीशक्तीचा गौरव आणि गुणगान गायले जात होते. पण याच दिवशी एका अल्पवयीन मुलीसोबत अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राजस्थान मधील झालावाड येथे १५ वर्षीय मुलीवर गुंगीचे औषध पाजवून नऊ नराधमांनी आठ दिवस बलात्कार केला. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ‘याप्रकरणातील दोन जण अल्पवयीन आरोपींसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.’

पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘१५ वर्षांच्या मुलीवर या नऊ नराधमांनी झालावाडमध्ये आठ दिवस वेगवेगळ्या जागेवर नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. शुक्रवारी पीडित मुलगी या नराधमांच्या तावडीतून सुटली. त्यानंतर इतरांची मदत घेऊन ती कशी बशी आपल्या घरी पोहोचली आणि घरातील लोकांना या घटनेबाबत सांगितले. यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.’ पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात दोन आरोपी अल्पवयीन आहे, अशी माहिती डीएसपी मंजीत सिंह यांनी दिली.

- Advertisement -

नक्की काय घडले?

पीडितेच्या तक्रारीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी आपला मित्र बुलबुल आणि एका अन्य तरुणासोबत शाळेची बॅग आणि इतर सामान खरेदी करण्यासाठी झालावाड शहरात गेली होती. सामान घेऊन झाल्यानंतर तिला शाळेत सोडले, असे तिच्या मित्राने सांगितले होते. पण दोघे एका गार्डनमध्ये थांबले. त्यावेळेस मुलीने विचारणा केली असता, ते म्हणाले की, कोणाला तरी भेटायचे आहे. काही वेळानंतर दोन ते तीन लोकं आले आणि तिला गार्डनमध्ये एक गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. झालावाडमध्ये आठ दिवस वेगवेगळ्या जागेवर त्यांनी तिला नेले. यादरम्यान कमीतकमी नऊ लोकांनी मुलीवर बलात्कार केला.

डीएसपी मंजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. याप्रकरणातील दोन अल्पवयीने आरोपींसह चार जणांना अटक करण्यात आले आहे. तर इतर आरोपींना लवकरच अटक केली जाणार आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – बनावट स्वाक्षरी, ठरावाने बँक खात्यात बदल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -