घरठाणेखेळायला घेतली आगपेटी अन् अख्खा बेड झाला खाक; आगीच्या धुरातून दोन आजीबाईंची...

खेळायला घेतली आगपेटी अन् अख्खा बेड झाला खाक; आगीच्या धुरातून दोन आजीबाईंची सुखरूप सुटका

Subscribe

खेळात पेटवलेल्या आगपेटीच्या काडीने बेडरुममधील बेड पेटल्याची घटना मंगळवारी दुपारी ठाण्यातील वृंदावन सोसायटीच्या ए. ३१ बिल्डिंगच्या रूम नंबर ४०३ घडली. या आगीच्या धुरामुळे त्याच रूमच्या खालच्या मजल्यावरील इतर रूममध्ये राहणाऱ्या दोन वयोवृद्ध आजीबाईंना ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य करत सुखरूप सुरक्षितस्थळी हलवल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वृंदावन सोसायटीत तळ अधिक चार मजली असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विनय मगरे यांच्या मालकीचा रूम आहे. घरात मगरे कुटुंब आपल्या दोन मुलींसह होते. त्यातच त्यांच्याकडील एक लहान मुलीने खेळताना किचन रूममधून आगपेटी आणून ती बेडरूममध्ये पेटवली. याचदरम्यान त्या काडीचा चटका तिला लागल्याने तिने हात झटकला त्यामुळे ती काडी जाऊन बेडवर पडली. काही क्षणात त्या बेडवरील कपड्यांनी पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच मगरे कुटुंबाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण बेडवरील गादी पेटून धूर झाला. हा धूर इमारतीच्या इतर घरात ही गेला. त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्या दोन वयोवृध्द आजीबाई आहेत. त्यांना त्या धुराचा त्रास होण्यापूर्वीच ठामपा अग्निशमन दल आणि कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य आवलंबून सुखरूप बाहेर काढले.

- Advertisement -

आगीच्या घटनेची माहिती मिळताच, ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांनी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १ फायर वाहन, १ पाण्याचे टँकर,१ रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. वृद्धकाळाने अडकलेल्या शैलजा परब (७५) आणि प्रतिभा जोशी (८५) अशा त्या दोन आजीबाईंची नावे आहेत. अशी माहिती कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.


हेही वाचा – वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -