घरताज्या घडामोडीरसायनी : फेसबुकवरील मैत्री पडली महागात

रसायनी : फेसबुकवरील मैत्री पडली महागात

Subscribe

इंग्लंड येथून ५० हजार पाउंडची रक्कम व भेट वस्तू पाठवत असल्याचे सांगून फसवणूक केली.

खालापूर तालुक्यातील रसायनी भागातील ५२ वर्षीय हेमंत विठ्ठल पालव यांना फेसबुकवर झालेली मैत्री महागात पडली आहे. २१ लाख ८५ हजार २०० रुपयाची फसवणूक झाली आहे. याबाबत हेमंत पालव यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २२ मार्च ते २५ जून या दरम्यान फेसबुकवरील मॅरिअम ब्रिजेड या मुलीशी मैत्री झाली. मॅरिअम हिने रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड चे अधिकारी असल्याचे सांगितले होते. तिने कोरोनाग्रस्तांना मदत करायचे,असे हेमंत याना सांगत विश्वास संपादन केला आणि इंग्लंड येथून ५० हजार पाउंडची रक्कम व भेटवस्तू पाठवत असल्याचे मॅरिअम यांनी हेमंतला सांगितले.

त्यानंतर दिल्ली येथील कस्टम अधिकारी सुनिता हिने कोरोनाग्रस्तांकरता मदत आल्याचे सांगत पार्सल मधील ५० हजार पाउंडची रक्कम व भेटवस्तू करता पार्सल क्लेरिंग चार्जेस करता ३५ हजार रूपये,करन्सी क्लेरिंग सर्टिफिकीट करता १ लाख ५० हजार रूपये, कव्हरजन चार्जेस ५ लाख ४० हजार रूपये ,इनकम टॅक्स करता ९ लाख २२ हजार ३०० रूपये, डिपोझीटरी चार्जेस करता १ लाख ५० हजार रूपये ,यलो टॅक्स चार्जेस करता ३ लाख ८७ हजार ९०० रूपये असे एकूण मिळून २१ लाख ८५ हजार २०० रूपये हेमंत यांचे कडुन टप्प्याने टप्प्याने उकळण्यात आले.परंतु ५० हजार पाऊंड आणि भेटवस्तू मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे मॅरिअम ब्रिजेड व अन्य दोघांविरोधात भा.दं.वि.कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००- (२००८ चे सुधारणेसह) ६६ C,D प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

-मनोज कलामकर


हेही वाचा – Tokyo Olympics : मेरी कोमचे आव्हान संपुष्टात; उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -