घरठाणेकळव्यात एका इमारतीच्या मीटर बॉक्सला आग; ६८ मीटर बॉक्स जळून खाक

कळव्यात एका इमारतीच्या मीटर बॉक्सला आग; ६८ मीटर बॉक्स जळून खाक

Subscribe

कळव्यातील मनीषा नगर गेट नंबर- २ जवळ असलेल्या प्रेम कुटीर सोसायटीच्या मीटर बॉक्स रूमला लागलेल्या आगीत तब्बल ६८ मीटर बॉक्स आणि २ लोखंडी कपाट, प्लास्टिक ड्रम व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास समोर आली.

ठाणे : कळव्यातील मनीषा नगर गेट नंबर- २ जवळ असलेल्या प्रेम कुटीर सोसायटीच्या मीटर बॉक्स रूमला लागलेल्या आगीत तब्बल ६८ मीटर बॉक्स आणि २ लोखंडी कपाट, प्लास्टिक ड्रम व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास समोर आली. जवळपास तासाभराने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. (A fire broke out in a building meter box in Kalwa Burn 68 meter box)

या आगीत कोणालाही दुखापत झालेली नसून आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कळवा, मनीषा नगर गेट नंबर- २ जवळील तळ अधिक ४ मजली प्रेम कुटीर या सोसायटीच्या मीटर बॉक्स रुमला सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलीस, टोरंट पॉवर विद्युत विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने धाव घेतली.

यादरम्यान मीटर रूम असलेल्या प्लास्टिक ड्रम व खुर्च्यांमुळे आग पसरली असून त्या आगीत त्या सोसायटीचे सर्वच ६८ मीटर बॉक्स आणि तेथील लोखंडी कपाट,प्लास्टिक ड्रम व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग जवळपास ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.

- Advertisement -


हेही वाचा – पुण्यात गॅसची पाईपलाईन फुटली, 12 वाजता लागलेल्या आगीवर पहाटे नियंत्रण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -