Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम पाळी असल्याने पत्नीचा हनिमूनला नकार, पतीने मारझोड करत केला बलात्कार

पाळी असल्याने पत्नीचा हनिमूनला नकार, पतीने मारझोड करत केला बलात्कार

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियाच्या एक पोस्टच्यामाध्यमातून महिलासोबत घडलेले धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. इस्राइलमध्ये टेलिव्हिजनवर दाखवलेल्या एका शोनंतर महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या दुःखत आणि वाईट घटना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये एका महिलेने सांगितले आहे की, ‘तिचा पती खूप संवेदनशील आणि चांगला माणूस होता. परंतु जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा तो तिच्यासोबत खूप वाईट वागला. यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.’

पुढे महिलेने लिहिले होते की, ‘तो खूप चांगला होता. जेव्हा आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते. त्यावेळेस मी गर्भवती राहिले आणि माझी डिलिव्हरी होणार होती. पण यादरम्यान आमचे भांडणं झाले. त्यानंतर त्याने मला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याने माझ्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले आणि माझा बलात्कार केला होता. यामुळे माझे मिसकॅरिज झाले. मी एका मोठा लढाईनंतर पतीसोबत घटस्फोट घेतला. नवऱ्यापासून दूर झाले, परंतु आजही मुलं गमावल्याच्या वेदना माझ्या हृदयात होत आहेत.’

- Advertisement -

याशिवाय ३४ वर्षांच्या अजून एका महिलेने पोस्टमध्ये लिहिले की, ‘हनिमूनच्या दिवशी मासिळ पाळी आली होती. तेव्हा पतीला सेक्स करण्यास नकार दिला होता. त्याला वाटले मी त्याला इन्टिमेंट करण्यात मनाई करत आहे. त्यानंतर त्याने मला मारहाण केली आणि माझ्यावर बलात्कार केला.’

दरम्यान नॅशनल काउंसिल फॉर वुमनच्या एका अहवालानुसार, प्रत्येक वर्षाला इजिप्तमध्ये ६५०० केस अशा असतात, ज्यामध्ये पतीने महिलेवर वैवाहिक बलात्कार, लैंगिक छळ करण्याच्या घटनांचा समावेश आहे. वुमन सेंटर फॉर गाइडेन्सचे एक वकील आणि कार्यकारी संचालकांनी बीबीसीसोबत बातचित करताना सांगितले की, ‘इजिप्तमध्ये एक स्त्री आपल्या पतीशी संबंध ठेवण्यासाठी २४ तास उपलब्ध असते, हे सामान्य आहे. यामुळे वैवाहिक बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत.’

- Advertisement -

या प्रकरणात इजिप्तच्या इस्लामिक सल्लागार मंडळाचा सदस्य दार अल-इफ्ता म्हणाले की, ‘जर कोणता व्यक्ती संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर हिंसाचार करतो, तर महिलेकडे पतीविरोधात तक्रार करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याला शिक्षाही होऊ शकते.’ असे असूनही गेल्या दोन वर्षात वुमन सेंटर फॉर गाइडेन्सने २००हून अधिक वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांची नोंद केली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वैवाहिक बलात्कार ही एक प्रकारची लैंगिक हिंसा आहे. परंतु इजिप्तमध्ये कायद्यात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही आहे.’

- Advertisement -