खालापूरमधील सोंडाई किल्ल्यावर शिवकार्य ट्रेकर्सचा अनोखा उपक्रम

स्थानिक लोकांच्या सहकार्याने गेली चार वर्षे सातत्याने दुर्गसंवर्धन मोहिमा घेतल्या जात आहेत.

A unique activity of shivkary trekkers at sodai fort in kolhapur
खालापूरमधील सोंडाई किल्ल्यावर शिवकार्य ट्रेकर्सचा अनोखा उपक्रम

खालापूर तालुक्यातील सोंडेवाडी येथे सुप्रसिध्द सोंडाई किल्ला आहे. या तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्स या दुर्गसंवर्धन ग्रुपच्यावतीने सूचना फलक लावण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा सोंडाई किल्ल्यावर शिवकार्य ट्रेकर्स मार्फत ठिकठिकाणी सूचना व महिती फलक लावण्यात आले आहेत.मात्र येणाऱ्या नवीन पर्यटक व ट्रेकर्संना सोंडाई गडाचा इतिहास माहिती होण्यासाठी व आपला वारसा टिकविण्यासाठी शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने रविवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोंडाई देवीच्या पहिल्या पायरीच्या ठिकाणी सर्वात मोठा सूचना फलक कायमस्वरूपी बसवण्यात आला.सदर सूचना फलकमध्ये सोंडाई दुर्गचा इतिहास, किल्ल्यावरील पर्यटनाबाबतचे नियम, इतर अत्यंत महत्वाच्या सूचना नमूद करण्यात आली आहे. याशिवाय किल्ल्यावर कोणत्या गोष्टी करता येतील अथवा करता येणार नाहीत याच्या सूचना सुद्धा येथे नमूद करण्यात आले आहे.सूचना फलक लावल्याने किल्लाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोंडाई किल्ल्यावरील लोखंडी शिड्या

 

सोंडाई किल्ला हा देवी सोंडाई माते च्या नावाने सुप्रसिद्ध आहे. किल्ल्यावरील असलेल्या लोखंडी शिड्या,पाण्याच्या टाक्या,घाटवाटा आणि सभोवताली हिरवीगार डोंगररांग सर्वांनाच प्रसन्न करते.म्हणूनच किल्ल्याच्या परिसरातील पावित्र्य नष्ट होऊ नये म्हणून शिवकार्य ट्रेकर्स या दुर्गसंवर्धन रायगड खालापूर ग्रुप येथील स्थानिक लोकांच्या सहकार्याने गेली चार वर्षे सातत्याने दुर्गसंवर्धन मोहिमा घेत आहेत. अलिबागचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व कर्जतचे वनक्षेत्रपाल निलेश भुजबळ व बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रितेश मोरे यांच्या सहकार्याने आणि शिवकार्याचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सरांच्या नेतृत्वाखाली ही तीन दिवसीय मोहीम यशस्वी करण्यात आली.

सोंडाई किल्ला हा देवी सोंडाई माते च्या नावाने सुप्रसिद्ध आहे.

एवढ्या उंचावर वजनी साहित्य घेऊन जात असताना दुर्गसेवकांनी कुठेच न थांबता सतत तीन दिवस महत्वपूर्ण योगदान दिले.दरम्यान स्वातंत्र्य दिनी सोंडाई देवी मातेची पूजा करून भारतीय ध्वजला सलामी देऊन राष्ट्रगीत सादर केले.सदर सूचना फलकचं उद्घाटन बोरगाव ग्रामपंचायत सदस्य पप्पू झोरे यांच्या हस्ते व शिवकार्य दुर्गसेवक यांच्याहस्ते पार पडले. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भंडारा उधळून श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय यांसारख्या घोषणा देऊन येणाऱ्या ट्रेकर्स व पर्यटक यांना शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे यांनी मार्गदर्शन केलं.


हेही वाचा – Indian Idol 12 Winner : पवनदीप कुमारने जिंकली ‘इंडियन आयडल १२’ ची ट्रॉफी