घरताज्या घडामोडीअननसाची यशस्वी लागवड; पोलादपूरच्या तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा

अननसाची यशस्वी लागवड; पोलादपूरच्या तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा

Subscribe

त्याने वडीलोपार्जित शेती पारंपारीक पद्धतीने न करता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर कसे होता येईल याचा अभ्यास केला.

कोरोनाच्या सावटामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडून अनेकांचा रोजगार थांबला. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वेगवेगळ्या नोकरी धंद्याचा मार्ग अवलंबला. उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असे म्हटले जाते किंबहुना तशी मानसिकता समाजात आहे. मात्र कोरोना महामारीच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला परिणामी शहरातून रोजगार नसल्याने मोठया प्रमाणावर तरूणाई आपल्या मुळ गावी परतले काही शेतीकडे वळले. अशांपैकी एक पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावचा तरुण नोकरी गमवल्यामुळे गावी आला. हा तरुण लाल मातीत रमला शेतीकडे वळताना त्याने वडीलोपार्जित शेती पारंपारीक पद्धतीने न करता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर कसे होता येईल याचा अभ्यास करून तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आगळा वेगळा मार्ग अवलंबला. अननस फळाची आपल्या शेतात लागवड केली कोकणात प्रामुख्याने पोलादपूर तालुक्यात प्रथमच अननस फळ लागवड करून त्याने एक आदर्श निर्माण केला. या कष्टाच्या घामातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या तरुणाचे अमर राजेंद्र कदम असे आहे .

अशी केली अननसाची लागवड

या अननसाच्या शेतीसाठी अमर या तरुणाने आपल्या पंचवीस गुंठ्याच्या शेतात नांगरणी केली. त्यानंतर १ मीटर अंतराचे गादी वाफे तयार केले. त्यावर ठिबक सिंचन व्यवस्थापन करुन मलचिंग पेपर प्रत्येक वाफ्यावर अंथरून त्यावर २ बाय १ फूट अंतरावर छिद्र काढून त्यात कोंभ फुटलेल्या अननसाच्या ३ हजार ५०० रोपांची लागवड केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील शेतकर्‍याकडून जायंट क्यू जातीची अननसाची रोपे लागवडीसाठी आणली आहेत. अननसाची वाढ चांगली होत असून, दोन वर्षांनी उत्पन्न हाती येणार आहे. लागवडीसाठी ६५ हजार खर्च आल्याची माहिती अमर याने दिली. या लागवडीसाठी अर्धा किलोमीटर अंतरावरील ओढ्याच्या पात्रातून डिझेल पंपाद्वारे पाणी शेतात आणण्यात आले आहे. हिवाळ्यात ६-७ दिवस तर उन्हाळ्यात ५-६ दिवस ठिंबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करण्यात आले आहे. यावेळी प्रस्तुत वार्ताहराशी बोलताना भविष्यात अननसापासून प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस ही अमर याने बोलून दाखवला.

- Advertisement -

…त्यामुळे तरूणाचा आत्मविश्वास वाढला

मंडळ कृषी अधिकारी सूरज निंबाळकर, सूरज पाटील, कृषी सहायक रवींद्र गुंडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते, असेही त्याने आर्वजून सांगितले. मागील रब्बी हंगामात तालुका कृषी विभागाच्या रोजगार योजनेतून त्यांनी कलमी आंबा लागवड आणि अंतरपीक कलिंगडाचे उत्पन्न घेतले असून, त्याची विक्री स्वतः मुंबई येथे केल्याने अमर याचा आत्मविश्वास वाढला आहे.

शेतकर्‍यांनी पारंपारिक पद्धतीने वर्षभरात एकमेव भातशेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
-कैलाश धुमाळ, तालुका कृषी अधिकारी

- Advertisement -

                                                                                                            – बबन शेलार 


हे ही वाचा – राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवारांनी केलं सूचक वक्तव्य


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -