घरCORONA UPDATELockdown Crisis: वांद्रे गर्दी प्रकरणी एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णीला अटक

Lockdown Crisis: वांद्रे गर्दी प्रकरणी एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णीला अटक

Subscribe

चूकीचे वृत्त दिल्याप्रकरणी एबीपी माझाचे विशेष प्रतिनिधी राहुल कुलकर्णीवर अजामीनपत्र गुन्हा दाखल

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत हजारो मजूर जमले होते. आम्हाला आमच्या गावी जाऊद्या, अशी मागणी या मजूरांनी केली होती. लॉकडाऊन असानाही इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी कशी जमली? याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. त्यानंतर काल नवी मुंबईतून विनय दुबे नामक व्यक्तिला अटक केली. तर आज बुधवारी उस्मानाबाद येथून एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे विशेष प्रतिनिधी राहुल कुलकर्णी याला अटक करण्यात आली असून दुपारी बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर केल्यानंतर एक बातमी दिली होती. ही बातमी भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या सिकंदराबादमधील कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्राचा हवाला देऊन एबीपी माझाने, “परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी जनसाधारण स्पेशल नावाची ट्रेन चालवण्यात येणार असल्याचे सांगितले होते.” मात्र ही बातमी देताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे आवाहन किंवा रेल्वे कधी निघणार याचा निश्चित वेळ दिला नव्हता.

- Advertisement -

janasadharan railway news and letter

मात्र ज्या पत्राच्या आधारावर या वृत्तवाहिनीने बातमी केली होती, ते रेल्वेचे अधिकृत पत्र असले तरी तो निर्णय नव्हता, तर शिफारस होती. तसेच असा कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील स्पष्ट केले. मग वांद्रे येथील गर्दी नेमकी का जमली? याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठीच राहुल कुलकर्णीला ताब्यात घेतले असून भादंवि कलम ११७, ११८, २६१, २७०, ५०५ ब संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्यातंर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच राहुल कुलकर्णीचा ताबा मुंबई पोलिसांकडे देण्यासाठी उस्मानाबाद शहर पोलिसांचे एक पथक मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक यु .एस. कस्तुरे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

- Advertisement -

तत्पूर्वी पोलिसांनी काल रात्री उशीरा नवी मुंबईतील विनय दुबे नामक व्यक्तीला देखील अटक करण्यात आलेली आहे. लोकांना गावी जाण्यास मदत करु. तसेच १८ एप्रिल रोजी पायी चालत आपण गावाला निघू, असे आवाहन दुबेने केले होते. दुबेवर देखील अजामीनपात्र गुन्हे दाखल केले असून त्याला आज कोर्टात सादर केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -