घरठाणेसहाय्यक वनसंरक्षक अधिकार्‍याला ACBने लाच घेताना रंगेहाथ केली अटक

सहाय्यक वनसंरक्षक अधिकार्‍याला ACBने लाच घेताना रंगेहाथ केली अटक

Subscribe

५ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

नौपाडा येथील सहाय्यक वनसंरक्षक विभागाचे अधिकारी बळीराम तुकाराम कोळेकर (५७) यांना ५ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. यातील तक्रारदार वन परिक्षेत्र अधिकारी, टोकावडे दक्षिण या पदावर कार्यरत आहेत. बळीराम कोळेकर हे त्यांच्याच कार्यालयात संरक्षण आणि अतिक्रमण निर्मुलन विभागात सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी म्हणून कामाला आहे.

२०२०-२१ साली रोपावाटिका संदर्भात तक्रारदारांना प्राप्त झालेल्या अठरा लाखाच्या निधीपैकी पाच टक्के म्हणजे ९२ हजार रुपयांची लाचेची मागणी कोळेकर यांनी केली होती. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील जंगलाचे संरक्षण, रोपांची लागवड आणि इतर कामासाठी त्यांना दोन वर्षांचा आर्थिक वर्षांतील एक कोटी सहा लाख चौवीस हजार रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जाहीर झाला होता. हा निधी देण्यासाठी त्यांच्याकडे कोळेकर यांनी पुन्हा पाच टक्क्याप्रमाणे ५ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यासाठी त्यांच्याकडे ते सतत पैशांचा तगादा लावत होते. ही रक्कम जिल्हा नियोजन अधिकारी खंदारे यांना द्यावे लागतील असेही कोळेकर यांच्याकडून सांगण्यात येत होते.

- Advertisement -

या लाचेला कंटाळून त्यांनी मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बळीराम कोळेकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. ६ सप्टेंबरला त्यांचा तक्रार अर्ज प्राप्त होताच या अधिकार्‍यांनी २० सप्टेंबर, ५ ऑक्टोबर आणि ७ ऑक्टोबर अशा तीन दिवशी त्याची शहानिशा केली होती. या तिन्ही वेळेस बळीराम कोळेकर यांनी त्यांच्याकडून ९२ हजार आणि ५ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने मंगळवारी त्यांच्या नौपाडा येथील मॅरेथॉन सर्कल, एलबीएस मार्ग, उपसंरक्षण ठाणे कार्यालयात सापळा लावून लाचेचा ५ लाख ३० हजार रुपयांचा हप्ता घेताना बळीराम कोळेकर यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी तिथे सुमारे साडेबारा लाख रुपयांची कॅश सापडली. ही कॅश पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली होती. या कॅशबाबत आता त्यांची चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -