घरताज्या घडामोडीवाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला, आरोपी गजाआड

वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला, आरोपी गजाआड

Subscribe

लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला केल्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध

गुन्हेगारी, अपघाताच्या घटनांमुळे पुणे नेहमी चर्चेत असते. तसेच वाहतूक नियमांच्या उल्लंघनामध्येही पुणे चर्चेचा विषय बनते. वाहतूक पोलीसाने अडवल्यावर निर्माण झालेल्या वादातून पोलिसावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी हे कंटेनरमध्ये होते. रस्त्यावर गर्दी असल्यामुळे पोलिसांनी कंटेनर मागे घेण्यास सांगितले होते. यानंतर तुला अक्कल नाही का असे वाहतूक कर्मचाऱ्याने आरोपींना बजावले. परंतु हा राग मनात घरुन आरोपींनी वाहतूक पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला केल्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नेमकं काय झाले

पोलिस कर्मचारी रवींद्र नामदेव करवंदे (वय३०) चाकण येथील मुख्य चौकात कर्तव्य बजावत होते. यादरम्यान रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. कर्मचाऱ्यांने आरोपीला कंटेनर मागे घेण्यास सांगितले. यावेळी पोलिस कर्मचारी यांनी तुला अक्कल नाही का असे आरोपीस म्हटले. परंतु वाहतूक पोलीसाने केलेल्या वक्तव्याने आरोपीला राग आला. यामुळे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आरोपी यांच्यात वाद झाला.

- Advertisement -

यानंतर हे आरोपी पुन्हा दुचाकीवर आले आणि कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर हल्ला केल्यानंतर त्यानंतर दोघांनी लगेच घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याला जबर मार बसला आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने खराबवाडी येथून अटक केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -